Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा

बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के असे बंपर व्याजदर देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:19 IST2025-08-24T12:14:50+5:302025-08-24T12:19:41+5:30

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के असे बंपर व्याजदर देत आहे.

Invest ₹1 Lakh in Post Office FD to Earn ₹23,508 in 3 Years | बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा

बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना चालवते, ज्यावर अनेकदा बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना बँकेच्या एफडीप्रमाणेच काम करते. यामध्ये तुम्ही निश्चित कालावधीसाठी पैसे जमा करता आणि मुदतपूर्तीनंतर तुम्हाला व्याजासहित तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून २३,५०८ रुपयांचे आकर्षक व्याज मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर ७.५% पर्यंत बंपर व्याज
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी एफडी खाते उघडता येते. टपाल कार्यालय आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.९%, २ वर्षांवर ७.०%, ३ वर्षांवर ७.१% आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% पर्यंत बंपर व्याज देत आहे. या खात्यात किमान १००० रुपये जमा करता येतात, तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये सिंगल अकाऊंटसोबत जॉइंट अकाऊंट (जास्तीत जास्त ३ व्यक्ती) देखील उघडता येते.

वाचा - येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

३ वर्षांच्या एफडीवर २३,५०८ रुपयांचा नफा
पोस्ट ऑफिसमध्ये ३ वर्षांच्या एफडीवर सध्या ७.१% वार्षिक व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत १ लाख रुपये ३ वर्षांसाठी जमा केले, तर मुदतपूर्तीनंतर तुम्हाला एकूण १,२३,५०८ रुपये मिळतील. यामध्ये २३,५०८ रुपये हे शुद्ध व्याज असेल. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत सर्व ग्राहकांना समान व्याज मिळते, तर बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही विशिष्ट कालावधीसाठी ०.५०% जास्त व्याज दिले जाते. यामुळे, पोस्ट ऑफिसची ही योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरते.

Web Title: Invest ₹1 Lakh in Post Office FD to Earn ₹23,508 in 3 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.