Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आतील पान - हेलिकॉप्टर घोटाळा -

आतील पान - हेलिकॉप्टर घोटाळा -

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST2014-06-20T22:27:57+5:302014-06-20T22:27:57+5:30

Inner Home - Helicopter Scam - | आतील पान - हेलिकॉप्टर घोटाळा -

आतील पान - हेलिकॉप्टर घोटाळा -

>
गोव्याच्या राज्यपालांचा जबाब घेणार

हेलिकॉप्टर घोटाळा : प. बंगालचे राज्यपालही प्रकरणात साक्षीदार

पणजी : हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी गोव्याचे राज्यपाल बी. व्ही. वांच्छू व पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांची साक्षीदार म्हणून येत्या आठवडाअखेर सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने चौकशी सुरू केल्यास वांच्छू यांच्यावर पदावरुन दूर होण्याची वेळ येऊ शकते.
दोन्ही राज्यपालांना विचारण्यासाठीची प्रश्नावली तयार करण्यात आली असून अधिकार्‍यांचे पथक त्यांच्याकडे पाठवले जाईल. केवळ साक्षीदार म्हणून राज्यपालांचे जबाब घेतले जाणार आहेत. त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही, असे सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा म्हणाले.
दिल्ली जल बोर्डाच्या घोटाळ्यात नाव असलेल्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा केरळच्या राज्यपाल शीला दीक्षीत यांची चौकशी होणार काय, असे विचारले असता त्याबाबत अजून विचार केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सशत्र दलांसाठी हेलिकॉप्टर खरेदीत ३६0 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. वांच्छू हे त्यावेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे प्रमुख होते तर नारायणन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. २00५ च्या बैठकीत वरील दोघेही सहभागी झाले होते आणि हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बदलास याच बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे साक्षीदार म्हणून जबाब महत्त्वाचे आहेत, असे सीबीआयचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Inner Home - Helicopter Scam -