lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचे सार्वभौम मानांकन कायम

भारताचे सार्वभौम मानांकन कायम

‘फिच’चे मत; वाढीची क्षमता मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:11 AM2018-04-28T01:11:58+5:302018-04-28T01:11:58+5:30

‘फिच’चे मत; वाढीची क्षमता मजबूत

India's universal rating continues | भारताचे सार्वभौम मानांकन कायम

भारताचे सार्वभौम मानांकन कायम

नवी दिल्ली : जागतिक मानक संस्था फिचने भारताचे सार्वभौम मानांकन ‘बीबीबी-’ असे कायम ठेवले असून, दृष्टीकोन स्थिर ठेवला आहे. भारताची मध्यम कालावधीतील वृद्धी क्षमता मजबूत असल्याचे ‘फिच’ने म्हटले आहे.
‘बीबीबी-’ हे गुंतवणुकीच्या बाबतीत नीचांकी मानांकन समजले जाते. फिचने म्हटले की, भारताचे वृद्धी भविष्य आणि बाह्य घटक यांच्यात समतोल दिसून येतो. भारताची वित्तीय स्थिती कमजोर आहे. शासन व्यवस्थेच्या दर्जासह अनेक रचनात्मक घटक पिछाडीवर आहेत. व्यावसायिक वातावरण कठीण असले, तरी सुधारत आहे.
‘फिच’ने म्हटले की, भारताचा वृद्धिदर चालू वित्त वर्षात ७.३ टक्के राहील. २०१९-२० मध्ये तो ७.५ टक्क्यांवर जाऊ शकतो. गेल्या ३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षातील वृद्धिदर ६.७ टक्के राहील. भारताला दिलेल्या स्थिर दृष्टीकोनाचा अर्थ आहे की, मानांकनाला कमी-जास्त करणारे जोखीम घटक व्यापक पातळीवर समतोल राखतील. मुडीजने भारताच्या मानांकनात तब्बल १४ वर्षांनंतर सुधारणा केल्यानंतर, फिचचा हा आढावा आला आहे. एसअँडपीनेही भारताचे सार्वभौम मानांकन कायम ठेवले आहे.

Web Title: India's universal rating continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.