मुंबई : २०२४ हे वर्ष भारतातील सोन्याच्या बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. भारतातील एकूण सोन्याची मागणी ८०२.८ टन झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात ५ टक्के वाढ झाली आहे.
आयात शुल्क कपात, लग्नसराई आणि सणासुदीमुळे या मागणीत वाढ झाली आहे. २०२५ मध्ये ही मागणी ७०० ते ८०० टन राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक सुवर्ण परिषद (डब्ल्यूजीसी)ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती आहे.
दागिन्यांची मागणी घटली
२०२४ मध्ये ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाल्यामुळे दागिन्यांची मागणी ११ टक्क्यांनी घसरून १,८,७७ टनांवर आली. मात्र मूल्याच्या दृष्टीने ती ९ टक्के वाढून १४४ अब्जांवर पोहोचली आहे.
सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा देखील विक्रीवर परिणाम दिसून आला. भारतीय पर्यटकांमधील मागणीवरही परिणाम झाला. भारतीय लोकांनी दुबईसारख्या देशांमध्ये सोने खरेदी करणे कमी केले.
अबब... २६ टक्के रिटर्न
२०२४ मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीत आश्चर्यकारक २६ टक्के वार्षिक परतावा मिळाला असून, सोन्यात वार्षिक गुंतवणूक १,१८० टन झाली आहे. त्याचे मूल्य ९० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.
भारत आणि चीनमधील वाढीमुळे अमेरिका, युरोपातील घसरणीची भरपाई झाली. बार आणि नाण्यांत भारताची २०२४ मध्ये २९ टक्के गुंतवणूक वाढली.