Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये

'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये

Ratan Tata Vs Jayanti Chauhan : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची ऑफर नाकारल्यानंतर अनेकांनी जयंती यांच्यावर टीका केली होती. मात्र, वर्षातच त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करत लोकांची तोंडं बंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:16 IST2024-12-27T11:10:27+5:302024-12-27T11:16:23+5:30

Ratan Tata Vs Jayanti Chauhan : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची ऑफर नाकारल्यानंतर अनेकांनी जयंती यांच्यावर टीका केली होती. मात्र, वर्षातच त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करत लोकांची तोंडं बंद केली.

indian woman who reject ratan tata offer earn 2300 crore in a year | 'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये

'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये

Ratan Tata Vs Jayanti Chauhan : टाटा समूहाचे दिवंगत अध्यक्ष रतन टाटा हे त्यांच्या दूरदर्शी आणि पारखी नजरेसाठी ओळखले जातात. मीठापासून सॅटेलाईटच्या डिशपर्यंत.. ज्या क्षेत्रात टाटांनी पाऊल ठेवलं तिथं आपलं नाव प्रस्थापित केलं. मात्र, २०२२ मध्ये एका बिझनेस वुमनने रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली. महिलेच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली. व्यवसाय चालवण्याचा अनुभव नाही, अशी हेटाळणी देखील झाली. मात्र, त्याच तरुणीने एका वर्षात २३०० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

साल होतं २०२२. देशातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड मिनरल वॉटर ब्रँड बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांना अचानक त्यांचा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रतन टाटा यांनी तो विकत घेण्यासाठी हात पुढे केला. रमेश चौहान हे 'ॲक्वा किंग' म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय विकणार असल्याचे सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर, वाढत्या वयानुसार, रमेश चौहान यांना व्यवसाय सांभाळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. दुसरीकडे त्यांची एकुलती एक मुलगा जयंती चौहान यांना कंपनी चालवण्यात रस नव्हता.

त्यामुळे ते आपला व्यवसाय रास्त भावाने विकण्यास तयार होते. चौहान यांच्या घोषणेने बाजारात खळबळ उडाली. जवळपास ५५ वर्षे भारताच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाजारपेठेवर राज्य करणाऱ्या बिस्लेरी ब्रँडच्या खरेदीसाठी अनेक संभाव्य खरेदीदारांनी रांगा लावल्या.

ऐकाहून एक मोठ्या ऑफर्स
पेप्सी आणि टाटा सारख्या जागतिक दिग्गजांनी बिस्लेरी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. भारतीय पॅकेज्ड वॉटर सेक्टरमध्ये बिस्लेरीचा ३२% हिस्सा आहे. या कंपनीने भारतात सुमारे १२२ प्लांट उघडले आहेत. त्याचे ४,५०० हून अधिक वितरक आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बिसलरीसाठी ७,००० कोटी रुपयांची ऑफर दिली. ही चांगली किंमत होती. परंतु, रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि कंपनीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला. बिस्लेरीचा व्यवसाय हाती घेतल्यानंतर जयंती चौहान यांनी वडिलांच्या कंपनीला संजीवनी दिली. त्यांच्या कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. वर्ष २०२२-२३ मध्ये, जयंती यांच्या नेतृत्वाखाली, बिस्लेरी इंटरनॅशनलने २,३०० कोटी रुपयांचा महसूल मिळवला.

कोण आहेत जयंती चौहान?
जयंती ह्या बिस्लेरी इंटरनॅशनलचे संस्थापक रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी आहे. जयंती यांचा जन्म दिल्लीत झाला, तिथून त्यांनी शालेय शिक्षण आणि पुढील शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. जयंती यांनी नंतर न्यूयॉर्कमधील लॉस एंजेलिस येथील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइजिंग (FIDM) मधून पदवी प्राप्त केली.
 

Web Title: indian woman who reject ratan tata offer earn 2300 crore in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.