Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता

इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता

Indian Airlines: इंडिगो संकटानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नव्या एअरलाईन्समुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:08 IST2025-12-24T18:07:14+5:302025-12-24T18:08:31+5:30

Indian Airlines: इंडिगो संकटानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नव्या एअरलाईन्समुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार!

Indian Airlines: IndiGo's dominance shaken; Government approves 'these' two new airlines | इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता

इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता

Indian Airlines: लवकरच भारतात नवीन दोन एअरलाईन्स सुरू होणार आहेत. देशातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून दोन नवीन एअरलाईन्सना आवश्यक परवानग्या देण्यात आल्याची माहिती माहिती नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लाय एक्सप्रेस’ अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. 

इंडिगो संकटाने प्रवाशांना नाहक त्रास

देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोच्या प्रणालीत अलीकडे बिघाड झाला होता. यामुळे संपूर्ण देशाची विमानसेवा विस्कळीत झाली. हजारो प्रवाशांना तासन्‌तास विमानतळांवर थांबावे लागले, अनेक जण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत. या घटनेमुळे भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

दोन कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न

सध्या देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या सुमारे 90 टक्के प्रवाशांकडून इंडिगो आणि टाटा समूहाच्या (एअर इंडिया) सेवांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत एका मोठ्या एअरलाईनमध्ये अडचण निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. ही जोखीम कमी करण्यासाठी सरकारने नव्या एअरलाईन्सना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, बाजारातील एकाधिकार कमी करून प्रवाशांना अधिक पर्याय देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने तीन नव्या विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठकाही घेतल्या आहेत.

नव्या एअरलाईन्स कोणत्या?

अल हिंद एअर – केरळस्थित अलहिंद ग्रुपची ही कंपनी असून, हा समूह आधीपासूनच ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात सक्रिय आहे.

फ्लाय एक्सप्रेस – हैदराबादस्थित ही कंपनी असून, कुरिअर आणि कार्गो सेवांचा अनुभव तिच्या पाठीशी आहे.

याशिवाय, शंख एअर या आणखी एका एअरलाईनला यापूर्वीच एनओसी मिळाली आहे. शंख एअर उत्तर प्रदेशातील लखनऊ, वाराणसी, आग्रा आणि गोरखपूर यांसारख्या शहरांना जोडण्याची योजना आखत आहे.

टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी दिलासा

सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअर आणि फ्लाय91 यांसारख्या लहान एअरलाईन्स आधीच कार्यरत आहेत. आता अल हिंद एअर, फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअरमुळे टियर-2 आणि टियर-3 शहरांची हवाई जोडणी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय, स्पर्धात्मक भाडे आणि चांगली सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title : इंडिगो के वर्चस्व को चुनौती, सरकार ने दो नई एयरलाइनों को मंजूरी दी।

Web Summary : इंडिगो में व्यवधान के बाद प्रतिस्पर्धा बढ़ाने के उद्देश्य से सरकार ने अल हिंद एयर और फ्लाई एक्सप्रेस को मंजूरी दी। इसका उद्देश्य कुछ प्रमुख एयरलाइनों पर निर्भरता कम करना, अधिक विकल्प और बेहतर सेवाएं प्रदान करना है।

Web Title : Government Approves Two New Airlines, Challenging Indigo's Dominance.

Web Summary : Government approves Al Hind Air and Fly Express, aiming to boost competition after Indigo's disruptions. This move seeks to reduce reliance on a few major airlines, offering more options and better services, especially for Tier-2 and Tier-3 cities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.