Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?

इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?

PMI Data Update : इराण आणि इस्रायल यांच्यात हा संघर्ष सुरू असला, तरी त्याचे परिणाम देशांतर्गत पातळीवरही स्पष्टपणे दिसून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:29 IST2026-04-06T14:31:11+5:302026-04-06T15:29:52+5:30

PMI Data Update : इराण आणि इस्रायल यांच्यात हा संघर्ष सुरू असला, तरी त्याचे परिणाम देशांतर्गत पातळीवरही स्पष्टपणे दिसून येत आहेत.

India Services PMI Hits 14-Month Low in March Amid Iran-Israel Conflict | इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?

इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?

PMI Data Update : इराण-इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतात उर्जा संकट उभे राहिले आहे. मात्र, युद्धाचा फक्त इंधनावरच नाही तर आणखी एका घटकावर गंभीर परिणाम झाल्याचे आता समोर आले आहे. मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका आता भारताच्या सेवा क्षेत्राला बसू लागला आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सेवा क्षेत्रातील मागणी मंदावली असून मार्च महिन्यात या क्षेत्राचा विस्तार गेल्या १४ महिन्यांतील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. HSBC इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक मार्चमध्ये घसरून ५७.५ वर आला आहे.

काय सांगतो 'PMI' निर्देशांक?
पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स हा अर्थव्यवस्थेची दिशा दर्शवणारा महत्त्वाचा निकष आहे. ५० च्या वर असलेला निर्देशांक 'विस्तार' दर्शवतो, तर ५० च्या खालील आकडा 'घसरण' स्पष्ट करतो.

  • फेब्रुवारी २०२६ : ५८.१
  • मार्च २०२६ : ५७.५ (जानेवारी २०२५ नंतरची सर्वात कमकुवत वाढ)
  • कंपोझिट आउटपुट इंडेक्स : हा निर्देशांक ५८.९ वरून ५७.० वर आला असून, ही साडेतीन वर्षांतील सर्वात संथ वाढ आहे.

निर्यातीत मात्र 'सुपर' तेजी
वाढीचा वेग मंदावला असला, तरी भारतीय सेवा क्षेत्रासाठी एक सकारात्मक बाजू समोर आली आहे.
विक्रमी निर्यात ऑर्डर : २०२४ नंतर मार्च महिन्यात नव्या निर्यात ऑर्डरमध्ये सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
ग्लोबल डिमांड : आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व या देशांकडून भारतीय सेवांना मोठी मागणी मिळत आहे. यामुळेच सेवा पुरवठादारांचा भविष्यातील वाटचालीबाबतचा आत्मविश्वास कायम आहे.

महागाईचा 'चटका'; इनपुट कॉस्ट वाढली
इंधन आणि वाहतूक खर्च वाढल्याचा थेट परिणाम सेवा क्षेत्रावर झाला आहे. विक्री शुल्कातील महागाई ७ महिन्यांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. चिकन, खाद्यतेल, अंडी, वीज, मासळी, फळे, इंधन आणि मजुरी यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जून २०२२ नंतर इनपुट कॉस्टमध्ये (कच्चा माल व सेवा खर्च) झालेली ही सर्वात वेगवान वाढ आहे.

वाचा - बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

रोजगाराच्या आघाडीवर 'दिलासा'
अर्थव्यवस्थेत सुस्ती असली, तरी नोकरीपेशा वर्गासाठी चांगली बातमी आहे.  सलग तिसऱ्या महिन्यात रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ २०२५ च्या मध्यापासूनची सर्वात वेगवान वाढ ठरली आहे. विशेषतः 'कन्झ्युमर सर्व्हिसेस' आणि 'फायनान्स व इन्शुरन्स' क्षेत्रात व्यावसायिक विश्वास वाढल्याने नवीन भरती प्रक्रियेला वेग आला आहे.
 

Web Title : ईरान-इज़राइल संघर्ष से भारत का सर्विस सेक्टर PMI धीमा; महंगाई बढ़ी

Web Summary : ईरान-इज़राइल संघर्ष के कारण मार्च में भारत के सेवा क्षेत्र की वृद्धि धीमी हो गई, जिससे वैश्विक मांग प्रभावित हुई। निर्यात में उछाल आया, लेकिन बढ़ती लागत और महंगाई चिंता का विषय है। रोजगार सृजन में सकारात्मक वृद्धि हुई।

Web Title : Iran-Israel Conflict Slows India's Service Sector PMI; Inflation Concerns Rise

Web Summary : India's service sector growth slowed in March due to the Iran-Israel conflict, impacting global demand. While exports surged, rising input costs and inflation are concerns. Job creation, however, showed positive growth, especially in consumer services and finance sectors.