lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण 

पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण 

ITR Return : करदात्यांना या आठवड्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. जाणून घ्या काय आहे कारण.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:13 PM2021-06-01T16:13:18+5:302021-06-01T16:14:43+5:30

ITR Return : करदात्यांना या आठवड्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. जाणून घ्या काय आहे कारण.

Income Tax Return You Will Not Be Able to Use ITR e Filing Portal from Today till 6 june | पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण 

पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण 

Highlightsकरदात्यांना या आठवड्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही.७ जूनपासून सुरू होणार नवी वेबसाईट

१ जूनपासून पुढील सहा दिवस करदात्यांनाइन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. इन्कम टॅक विभागाची साईट १ जून ते ६ जून या कालावधीत बंद राहणार असल्यानं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. गेल्या महिन्यात इन्कम टॅक्स विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती. तसंच रुटीन ITR फाईल करण्यासाठी आणि टॅक्सशी निगडीत काही अन्य कामं करण्यासाठी १ जून ते ६ जून या कालावधीत वेबसाईट बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. डिपार्टमेंट ऑफ सिस्टम विंगच्या एका आदेशानुसार ७ जूनपासून  www.incometaxindiaefiling.gov.in ऐवजी नवं पोर्टल www.incometaxgov.in सुरू होणार आहे. या साईटच्या लाँचची तयारी आणि मायग्रेशनबाबत १ ते ६ जूनपर्यंत इन्कम टॅक्स विभागाची सध्याची वेबसाईट बंद राहणार आहे. 

या कालावधीत ही वेबसाईट केवळ करदात्यांसाठीच नाही तर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसाठीही बंद राहणार आहे. नव्या सिस्टमबाबत करदात्यांची कोणतीही सुनावणी आणि तक्रारींसाठी सर्व अधिकारी १० जून नंतरच उपलब्ध असतील. आदेशानुसार करदाते आणि आयटी विभागाच्या अॅक्सेसिंग ऑफिसरदरम्यान सर्व वर्क शेड्युल प्रीपॉन्ड अथवा स्थगित केले आहेत.

करदाते ई फायलिंग पोर्टलद्वारे आपल्या वैयक्तीक किंवा व्यवसायाचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असतात.  याशिवाय या पोर्टलद्वारे रिफंडसाठीही अर्ज केला जाऊ शकतो. तसंच टॅक्सशी निगडीत अन्य कामंही केली जातात. टॅक्समॅन या पोर्टलच्याद्वारे 

Web Title: Income Tax Return You Will Not Be Able to Use ITR e Filing Portal from Today till 6 june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.