Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

8th Pay Commission: आजकाल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये फिटमेंट फॅक्टर या विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक, ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:00 IST2025-11-03T13:00:20+5:302025-11-03T13:00:20+5:30

8th Pay Commission: आजकाल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये फिटमेंट फॅक्टर या विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक, ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते.

If your salary is rs 34000 how much will it be after the 8th Pay Commission Know the calculation | ₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

8th Pay Commission: आजकाल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) या विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक, ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ८ व्या वेतन आयोगाच्या 'टर्म्स ऑफ रेफरन्स'ला (ToR) मंजुरी दिली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा न्यायमूर्ती (निवृत्त) रंजन देसाई यांच्याकडे सोपण्यात आलीय. आयोग येत्या काही महिन्यांत विविध भागधारकांशी चर्चा करेल आणि त्यानंतर वेतन सुधारणेच्या शिफारशी सादर करेल.

कर्मचारी संघटनांची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था 'नॅशनल कौन्सिल- संयुक्त सल्लामसलत यंत्रणे'चा (NC-JCM) कर्मचारी पक्ष या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल. एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना एका वरिष्ठ सदस्यानं सांगितलं की, ८ व्या वेतन आयोगानं किमान ७ व्या वेतन आयोगाने सुचवलेला २.५७ इतका फिटमेंट फॅक्टर निश्चित करावा, अशी त्यांची मागणी आहे. तथापि, सध्या एनसी-जेसीएमकडून यावर कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. एका सदस्यानं सांगितलं की, फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यापूर्वी महागाई दर, लाईफस्टाईल इंडेक्स (Life Style Index) आणि डॉ. एक्रॉयड यांचं सूत्र (Dr. Aykroyd's Formula) यांसारख्या अनेक घटकांचा विचार केला जातो.

डॉ. एक्रॉयड यांचे सूत्र काय आहे?

डॉ. वॉलेस आर. एक्रॉयड हे २० व्या शतकातील एक प्रसिद्ध अमेरिकन पोषणतज्ञ होते. त्यांच्या नावावर असलेल्या या सूत्रामध्ये सामान्य ग्राहकांच्या गरजांनुसार वस्तूंच्या किमतीतील बदलांचा विचार केला जातो. शिमला येथील श्रम ब्युरो वेळोवेळी या निर्देशांकाचं पुनरावलोकन करतं.

अहवालांमध्ये काय म्हटलंय?

अ‍ॅम्बिट कॅपिटलच्या एका अहवालानुसार (९ जुलै), सरकार ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.४६ पेक्षा जास्त ठेवणार नाही. अहवालात म्हटलंय की, गणनेनुसार हा १.८३ ते २.४६ च्या दरम्यान असू शकतो. काही अटकळी २.५७ ते २.८६ पर्यंतच्या फिटमेंट फॅक्टरबद्दल असल्या तरी, तो लागू होण्याची शक्यता कमी आहे, असंही अहवालात नमूद आहे.

दुसरीकडे, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार (२१ जुलै), फिटमेंट फॅक्टर १.८ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन सध्याच्या दरापेक्षा १.८ पट (८०%) वाढू शकते. तथापि, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, ८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर, सध्याचा महागाई भत्ता (DA) जो सध्या ५८% आहे, तो शून्य (०%) वर 'रीसेट' होईल, ज्यामुळे एकूण वेतनवाढीचा परिणाम काहीसा कमी दिसेल. अ‍ॅम्बिट कॅपिटलनुसार, १.८३ ते २.४६ च्या फिटमेंट फॅक्टरमुळे वेतनात १४% ते ३४% पर्यंत प्रभावी वाढ होऊ शकते. कोटकच्या अहवालानुसार, १.८ च्या फिटमेंट फॅक्टरमुळे एकूण वेतनात सुमारे १३% वाढ होईल.

७ व्या वेतन आयोगात २.५७ चा फिटमेंट फॅक्टर असूनही, प्रभावी वाढ केवळ १४.३% राहिली होती, कारण त्या वेळी ६ व्या वेतन आयोगाच्या समाप्तीपर्यंत महागाई भत्ता (DA) १२५% पर्यंत वाढला होता, जो शून्य (०%) करण्यात आला होता.

७ व्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन (२०१६) खालीलप्रमाणे होतं:

मूळ वेतन (Basic Pay): ₹१८,०००

घरभाडं भत्ता (HRA): ₹४,३२०

प्रवास भत्ता (TA): ₹१,३५०

महागाई भत्ता (DA): ₹०

एकूण वेतन: ₹२३,६७०

सध्या ५८% महागाई भत्ता (DA) जोडल्यानंतर हे किमान वेतन अंदाजे ₹३४,११० झालं आहे.

८ व्या वेतन आयोगात संभावित किमान मूळ वेतन
 

जर ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजित आकडेवारीवर नजर टाकली, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ७ व्या वेतन आयोगांतर्गत किमान मूळ वेतन ₹१८,००० आहे.

  • जर नवीन फिटमेंट फॅक्टर १.८ निश्चित केला गेला, तर हे वेतन वाढून ₹३२,४०० होईल.

  • जर फिटमेंट फॅक्टर २.० असेल, तर मूळ वेतन ₹३६,००० होईल.
  • २.४६ च्या फॅक्टरवर ते ₹४४,२८० पर्यंत पोहोचू शकते.
  • जर सरकारने ७ व्या वेतन आयोगासारखा किंवा त्याहून थोडा अधिक २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू केला, तर किमान मूळ वेतन ₹४६,२६० पर्यंत वाढू शकते.
     

परंतु, अंतिम निर्णय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. तरीही, या अंदाजित आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कर्मचाऱ्यांच्या 'बेसिक पे' मध्ये ८०% ते १५७% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण वेतन रचनेत मोठा बदल घडून येऊ शकतो.

Web Title : 8वां वेतन आयोग: वेतन वृद्धि गणना और फिटमेंट फैक्टर की व्याख्या।

Web Summary : 8वें वेतन आयोग पर चर्चा चल रही है, जिसमें फिटमेंट फैक्टर पर ध्यान केंद्रित किया गया है जो वेतन संशोधन को प्रभावित करता है। कर्मचारी संघ 2.57 के फिटमेंट फैक्टर का प्रस्ताव कर रहे हैं। रिपोर्टों में 14% से 34% तक संभावित वृद्धि का अनुमान है, जिसमें सहमत कारक के आधार पर न्यूनतम मूल वेतन में काफी वृद्धि हो सकती है।

Web Title : 8th Pay Commission: Salary hike calculations and fitment factor explained.

Web Summary : The 8th Pay Commission is under discussion, focusing on the fitment factor that impacts salary revisions. Employee unions propose a 2.57 fitment factor. Reports estimate potential increases from 14% to 34%, with minimum basic pay possibly rising significantly based on the agreed factor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.