lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI Prudential: ‘ही’ कंपनी पॉलिसीधारकांना देतेय तब्बल ८६७ कोटींचा बोनस; यंदा १० टक्के वाढ

ICICI Prudential: ‘ही’ कंपनी पॉलिसीधारकांना देतेय तब्बल ८६७ कोटींचा बोनस; यंदा १० टक्के वाढ

ICICI Prudential: गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घोषित करण्यात आलेला बोनस १० टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:32 PM2021-06-08T17:32:34+5:302021-06-08T17:34:09+5:30

ICICI Prudential: गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घोषित करण्यात आलेला बोनस १० टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

icici prudential life insurance announced highest of rs 867 crore bonus to policyholders | ICICI Prudential: ‘ही’ कंपनी पॉलिसीधारकांना देतेय तब्बल ८६७ कोटींचा बोनस; यंदा १० टक्के वाढ

ICICI Prudential: ‘ही’ कंपनी पॉलिसीधारकांना देतेय तब्बल ८६७ कोटींचा बोनस; यंदा १० टक्के वाढ

Highlightsयंदा सलग १५ व्या वर्षी बोनस जाहीरयंदाच्या वर्षी घोषित करण्यात आलेला बोनस १० टक्के अधिक एकूण ९.८ लाख सहभागी विमाधारकांना फायदा होणार

मुंबई: कोरोना संकटाच्या काळातही काही क्षेत्रातील कंपन्यांना प्रचंड मोठा नफा झालेला आहे. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. मात्र, विमा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एका कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी तब्बल ८६७ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घोषित करण्यात आलेला बोनस १० टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे. (icici prudential life insurance announced highest of rs 867 crore bonus to policyholders) 

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने सर्व पात्र विमाधारकांसाठी आर्थिक वर्ष २०२१ चा ८६७ कोटी रुपयांचा वार्षिक बोनस जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०२१ मधे कंपनीच्या इतिहासातला आजवरचा सर्वात जास्त वार्षिक बोनस जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांवर असलेला भर आणि कोरोना संकटाच्या काळात अनपेक्षित आव्हानांतून वाट काढण्याची आमची क्षमता दिसून आली आहे. ग्राहकांच्या प्रती असलेली बांधिलकी आम्हाला सध्याच्या आव्हानात्मक काळात सतत प्रेरणा देत आहे, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. कन्नन यांनी म्हटले आहे. 

RBI चा दणका! ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ६ कोटींचा दंड; नेमकं कारण काय?

यंदा सलग १५ व्या वर्षी बोनस जाहीर

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने यंदा सलग १५ व्या वर्षी बोनस जाहीर केला आहे. सर्व सहभागी विमा योजना म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या योजना हा बोनस मिळवण्यासाठी लागू असून तो विमाधारकांच्या लाभांमधे समाविष्ट केला जाईल. एकूण ९.८ लाख सहभागी विमाधारकांना याचा फायदा होणार आहे. बोनस हा कंपनीच्या सहभागी विमाधारकांच्या फंडामुळे तयार झालेल्या नफ्याचा हिस्सा असून तो विमाधारकांच्या खात्रीशीर मॅच्युरिटी बेनिफिट्समधे समाविष्ट केला जाणार असल्याने पर्यायाने एकूण रक्कम वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. 

पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; ‘या’ राज्यात सर्वाधिक दर

दरम्यान, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे पोर्टफोलिओमधील डिफॉल्ट्सचे प्रमाण शून्य आहे. ३१ मार्च २०२१ रोजी निश्चित उत्पन्न पोर्टफोलिओचा ९६.८ टक्के भाग सॉर्व्हजिन किंवा एएए रेटेड पेपरमधे गुंतवण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. 
 

Web Title: icici prudential life insurance announced highest of rs 867 crore bonus to policyholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.