Smart investment : आयुष्य जसजसे पुढे सरकते, तसतसे जबाबदाऱ्या आणि गरजा वाढत जातात. त्यामुळे केवळ कमाई करणे पुरेसे नाही, तर योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. विशेषतः, तुम्ही जेव्हा ३० वर्षांचा टप्पा ओलांडता आणि तुमचे करिअर स्थिर होते, तेव्हा आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करणे खूप महागात पडू शकते. जर तुम्हाला ३५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून १ कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर आताच सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे.
तुम्ही जर वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत गुंतवणूक केलीत, तर तुमच्याकडे एकूण २५ वर्षांचा कालावधी असेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, परदेशात जाण्याच्या स्वप्नासाठी किंवा स्वतःच्या घरासाठी १ कोटी रुपये वाचवणे कठीण नाही. योग्य गुंतवणुकीद्वारे तुम्ही तुमचे हे आर्थिक ध्येय कसे साध्य करू शकता, ते पाहूया.
१ कोटी रुपयांचा निधी कसा तयार कराल?
१ कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी फार काही गुंतागुंतीचे नियोजन करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने पैसे गुंतवावे लागतील. यासाठी तुम्ही तुमचे पैसे तीन मुख्य भागांमध्ये विभागू शकता.
- म्युच्युअल फंड
- सोने
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
प्रत्येक पर्यायात किती गुंतवणूक कराल?
जर तुम्ही या तीन पर्यायांमध्ये थोडी-थोडी गुंतवणूक केली आणि १५ वर्षे नियमितपणे पैसे गुंतवले, तर १ कोटी रुपयांचा फंड तयार करणे शक्य आहे. यात तुम्हाला चक्रवाढीचा मोठा फायदा मिळेल, म्हणजेच तुमच्या गुंतवलेल्या पैशावरही व्याज मिळेल आणि त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळेल.
म्युच्युअल फंड (SIP मध्ये)
- तुम्ही दरमहा सुमारे१०,५०० रुपये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता.
- १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १८.९ लाख रुपये होईल.
- जर म्युच्युअल फंडाने १२% वार्षिक परतावा दिला (हा अंदाज आहे, हमी नाही), तर तुम्हाला सुमारे ३१ लाखांचा नफा मिळेल.
- एकूण, म्युच्युअल फंडातून तुमचा निधी सुमारे ४८ लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
- तुम्ही दरमहा ८,००० रुपये पीपीएफमध्ये गुंतवू शकता.
- सरकार सध्या यावर ७.१% वार्षिक व्याज देत आहे आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
- १५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक १४.४ लाख रुपये होईल.
- यावर तुम्हाला सुमारे १०.८४ लाख रुपये व्याज मिळेल.
- एकूण, पीपीएफमधून तुमचा निधी सुमारे २५ लाखांच्या जवळपास असेल.
सोने
- तुम्ही दरमहा १०,७०० रुपये सोन्यात (उदा. डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF किंवा SGB मध्ये) गुंतवणूक करू शकता.
- गेल्या काही वर्षांत सोन्याने सरासरी १०% वार्षिक परतावा दिला आहे.
- १५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक सुमारे १२.८४ लाख रुपये होईल.
- यावर तुम्हाला सुमारे १२ लाखांचा नफा मिळेल.
- एकूण, सोन्यामधून तुमच्याकडे सुमारे २५ लाखांचा निधी असेल.
एकूण १ कोटींचा निधी कसा जमा होईल?
- म्युच्युअल फंड: ४८ लाख रुपये
- पीपीएफ : २५ लाख रुपये
- सोने : २५ लाख रुपये
- एकूण निधी : सुमारे ९८ लाख रुपये
याचा अर्थ, तुम्ही १५ वर्षांत सुमारे १ कोटींचा निधी सहज तयार करू शकता!
वाचा - टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)