lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Franchise: फक्त 5000 रुपयांत पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्या; पहिल्या दिवसापासून मोठी कमाई होईल

Post Office Franchise: फक्त 5000 रुपयांत पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्या; पहिल्या दिवसापासून मोठी कमाई होईल

How to start my own business: पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post office franchise) कोणीही व्यक्ती, संस्था, पान शॉप, किराना दुकान, स्टेशनरी आदी दुकानदार देखील घेऊ शकतात. तुम्हाला यावर कमिशन मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:56 PM2021-11-05T12:56:58+5:302021-11-05T12:57:13+5:30

How to start my own business: पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post office franchise) कोणीही व्यक्ती, संस्था, पान शॉप, किराना दुकान, स्टेशनरी आदी दुकानदार देखील घेऊ शकतात. तुम्हाला यावर कमिशन मिळते.

How to start my own business: Get a Post Office Franchise for just Rs.5000; big earnings from day one | Post Office Franchise: फक्त 5000 रुपयांत पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्या; पहिल्या दिवसापासून मोठी कमाई होईल

Post Office Franchise: फक्त 5000 रुपयांत पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्या; पहिल्या दिवसापासून मोठी कमाई होईल

जर तुम्हाला कमी गुंतणुकीत व्यवसाय सुरु करायचा (How to start my own business)  असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशभरात 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस असली तरी तरी अनेक भागांत पोस्ट ऑफिस नाहीएत. यामुळे पोस्‍टल डिपार्टमेंट इंडिया पोस्‍ट (India Post) ने अशा भागांत फ्रँचायजी देण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी तुम्ही ही फ्रँचायजी कशी घ्यायची याची माहिती मिळवू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. 

जर तुम्हाला ही फ्रँचायजी घ्यायची असेल तर तुम्हाला 5000 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट द्यावे लागणार आहे. या द्वारे स्ँटप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आणि मनी ऑर्डर सारख्या सुविधा देऊ शकता. याद्वारे तुम्हाला ठराविक कमिशन मिळत जाईल आणि दररोजची कमाई होत राहिल. 

कोण घेऊ शकतो...
पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post office franchise) कोणीही व्यक्ती, संस्था, पान शॉप, किराना दुकान, स्टेशनरी आदी दुकानदार देखील घेऊ शकतात. याशिवाय नवीन विकसित होत असलेली शहरे, विभाग, स्पेशल इकॉनॉमी झोन, इंडस्ट्री सेक्टर आदी ठिकाणी ही उघडता येणार आहे. यासाठी तुम्हाला पोस्टात फॉर्म भरावा लागणार आहे. पोस्टासोबत करार करावा लागणार आहे. यासाठी तुमचे शिक्षण 8 वी पास असावे आणि वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, अशी माफक अट आहे. 

कमाई किती...
फ्रँचायजीतून होणारी कमाई ही पोस्टल सेवांवर दिल्या जाणाऱ्या कमिशनमधून होते. हे कमिशन MOU मध्ये नोंद असते. रजिस्टर आर्टिकलवर 3 रुपये, स्पीट पोस्टासाठी 5 रुपये, 100-200 रुपयांच्या मनीऑर्डरवर 3.50 रुपये, 200 हून अधिकच्या मनीऑर्डरवर 5 रुपये, दर महिन्याला रजिस्टर आणि स्पीड पोस्टाचा 1000 हून अधिक बुकिंग केले तर त्यावर 20 टक्के अधिकचे कमिशन, पोस्टाचे स्टँप, पोस्टल स्टेशनरी, मनी ऑर्डर फॉर्मवर 5 टक्के, रेव्हेन्यू स्टँप, सेंट्रल रिक्रूटमेंट फी स्टँप आदीवर झालेल्या कमाईच्या 40 टक्के. 
 

Web Title: How to start my own business: Get a Post Office Franchise for just Rs.5000; big earnings from day one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.