Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर

गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर

Home Loan Interest Rates India 2025 : जर तुम्ही कर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व बँकांच्या व्याजदरांचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:59 IST2025-10-26T16:42:38+5:302025-10-26T16:59:06+5:30

Home Loan Interest Rates India 2025 : जर तुम्ही कर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व बँकांच्या व्याजदरांचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत.

Home Loan Interest Rates 2025 Compare Latest Rates from SBI, HDFC, ICICI, and PNB Before Buying Your Dream Home | गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर

गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर

Home Loan Interest Rates : देशातील मालमत्तांचे दर दररोज गगनाला भिडत आहेत. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी घरांच्या वाढत्या किमती मोठे आव्हान ठरत आहेत. विशेषतः देशातील टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये तर घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत. यामुळे, घर खरेदी करण्यासाठी बहुतांश लोक बँक कर्जाचा आधार घेतात. परंतु, प्रत्येक बँक वेगवेगळ्या व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करते. जर तुम्ही कर्ज घेऊन घर घेण्याचा विचार करत असाल, तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुम्ही सर्व प्रमुख बँकांचे व्याजदर तपासणे महत्त्वाचे आहे.

सरकारी बँकांचे गृहकर्ज व्याजदर

बँकेचे नावगृहकर्जाचा व्याजदर (टक्के)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया७.३५%
बँक ऑफ इंडिया७.३५%
कॅनरा बँक७.४०%
पंजाब नॅशनल बँक७.४५%
बँक ऑफ बडोदा७.४५%
युनियन बँक ऑफ इंडिया७.४५%
भारतीय स्टेट बँक७.५०%

या यादीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया सर्वात कमी ७.३५% दरात गृहकर्ज देत आहेत.

खासगी बँकांचे गृहकर्ज व्याजदर 

बँकेचे नावगृहकर्जाचा व्याजदर (टक्के)
आयडीबीआय बँक७.५५%
आयसीआयसीआय बँक७.७०%
एचडीएफसी बँक७.९०%
ॲक्सिस बँक८.३५%
येस बँक९.००%


खासगी बँकांमध्ये आयडीबीआय बँक (७.५५%) आणि आयसीआयसीआय बँक (७.७०%) तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध करत आहेत.

वाचा - ५ लाख रुपयांचे मिळतील १० लाख! पोस्ट ऑफिसची 'ही' सरकारी योजना १००% सुरक्षित, काय आहेत फायदे?

कर्ज घेण्यापूर्वी काय तपासावे?

  • केवळ व्याजदरच नाही, तर कर्ज घेताना लागणारी प्रोसेसिंग फी आणि इतर छुपे शुल्क देखील तपासा.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास बँक तुम्हाला घोषित केलेल्या दरांपेक्षा कमी दरातही कर्ज देऊ शकते.
  • गृहकर्ज घेण्याचा निर्णय तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांच्या दरांची तुलना करूनच योग्य बँकेची निवड करा.

Web Title : होम लोन: सबसे कम ब्याज दरों के लिए बैंकों की तुलना करें।

Web Summary : अपना घर खरीदने का सपना? सबसे अच्छा सौदा पाने के लिए सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, आईडीबीआई जैसे शीर्ष सार्वजनिक और निजी बैंकों से होम लोन की ब्याज दरों की तुलना करें। निर्णय लेने से पहले प्रोसेसिंग फीस और क्रेडिट स्कोर लाभों की जांच करें।

Web Title : Home Loan Interest Rates: Compare rates from top banks for lowest EMI.

Web Summary : Dreaming of owning a home? Compare home loan interest rates from top public and private banks like Central Bank of India, IDBI to find the best deal. Check processing fees and credit score benefits before deciding.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.