Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा

३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा

Home Loan Tips : जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेताना व्याजाची चिंता वाटत असेल, तर हा ताण बाजूला ठेवा. आज, आम्ही एक अशी युक्ती सांगणार आहोत जी तुमचे गृहकर्ज व्याजमुक्त करेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 12:23 IST2025-10-05T12:18:42+5:302025-10-05T12:23:42+5:30

Home Loan Tips : जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेताना व्याजाची चिंता वाटत असेल, तर हा ताण बाजूला ठेवा. आज, आम्ही एक अशी युक्ती सांगणार आहोत जी तुमचे गृहकर्ज व्याजमुक्त करेल.

Home Loan Interest-Free Use This ₹1,700 Monthly SIP Trick to Pay Off Your Entire Interest Cost | ३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा

३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा

Home Loan Tips : स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र, अनेक लोकांना गृह कर्जावरील प्रचंड व्याजदरामुळे आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. कर्ज कितीही लहान असले तरी त्याचा दीर्घ कालावधीतील व्याज मुद्दलापेक्षा जास्त होते. पण, आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या एका सोप्या युक्तीचा वापर करून तुम्ही तुमचे गृह कर्ज प्रभावीपणे व्याजमुक्त करू शकता. तुम्हाला कर्जावर जेवढे व्याज द्यावे लागेल, त्यापेक्षा जास्त परतावा तुम्ही एका छोट्या गुंतवणुकीतून मिळवू शकता.

गृह कर्ज व्याजमुक्त करण्याची 'SIP' ट्रिक काय?
गृह कर्ज सहसा १५ ते ३० वर्षांच्या मोठ्या कालावधीसाठी घेतले जाते. या ट्रिक्समध्ये तुम्हाला तुमच्या गृह कर्जाच्या मंजुरीनंतर लगेचच एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करायचा आहे.
सोपे नियम: तुमचा गृह कर्जाचा कालावधी जर ३० वर्षांचा असेल, तर तुम्ही एसआयपीची मुदतही ३० वर्षे ठेवा.
SIP ची रक्कम: कर्जाच्या व्याजावर मात करण्यासाठी तुम्हाला दरमहा केवळ १,५०० ते २,००० रुपयांची एक छोटी एसआयपी म्युच्युअल फंडात सुरू करायची आहे. चक्रवाढ व्याजाच्या मदतीने ही लहान गुंतवणूक मोठा निधी उभा करते.

उदाहरणार्थ: गृह कर्जाचे गणित
हे गणित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृह कर्जाच्या आधारावर समजून घेऊ

तपशीलरक्कम
गृह कर्जाची मूळ रक्कम३० लाख
कर्जाचा कालावधी३० वर्षे
अंदाजित व्याजदर७.५०% (वार्षिक)
बँकेला दिलेली एकूण रक्कम७५,५१,५१७ लाख रुपये
३० वर्षांत भरलेले एकूण व्याज४५,५१,५१७ लाख रुपये

SIP चा पॉवर आणि मोठा परतावा
आता तुम्ही कर्जाच्या पहिल्या महिन्यापासून दरमहा फक्त १,७०० रुपयांची एसआयपी सुरू केली (आणि बाजारातून साधारणपणे १२% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास)

तपशील रक्कम
दरमहा SIP१,७०० रुपये
SIP कालावधी३० वर्षे
३० वर्षांत जमा केलेली एकूण गुंतवणूक६,१२,००० रुपये
३० वर्षांत मिळालेला व्याज/परतावा४६,२५,६५४ रुपये
नंतर जमा होणारा एकूण निधी (कॉर्पस)५२,३७,६५४ रुपये

तुम्ही गृह कर्जावर भरलेले एकूण व्याज (४५,५१,५१७ रुपये) या एसआयपीमधून मिळालेल्या परताव्यापेक्षा (४६,२५,६५४ रुपये) कमी आहे.

वाचा - ४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?

याचा अर्थ, एसआयपीने कमावलेला अतिरिक्त नफा तुमच्या गृह कर्जाचा संपूर्ण व्याज खर्च सहजपणे भरून काढतो, ज्यामुळे तुमचे गृह कर्ज प्रभावीपणे व्याजमुक्त ठरते! हा निधी तुम्ही कर्जाच्या शेवटी भरलेला व्याज किंवा कर्जाची मोठी रक्कम कमी करण्यासाठी वापरू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : SIP निवेश से 30 साल का होम लोन ब्याज मुक्त करें।

Web Summary : SIP के जरिए होम लोन के भारी ब्याज को कम करके घर के मालिक बनने का सपना साकार करें। म्यूचुअल फंड में हर महीने थोड़ा निवेश करें। 12% रिटर्न के साथ 30 वर्षों में ₹1,700 की मासिक SIP, भुगतान किए गए कुल ब्याज से अधिक हो सकती है, जिससे लोन प्रभावी रूप से ब्याज मुक्त हो जाएगा।

Web Title : Pay off your 30-year home loan interest-free with SIP investment.

Web Summary : Homeownership dreams can be realized by smartly using SIPs to offset hefty home loan interest. Invest just a little every month in a mutual fund. A monthly SIP of ₹1,700 over 30 years, with 12% returns, can surpass the total interest paid, effectively making the loan interest-free.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.