Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST2014-06-20T22:27:58+5:302014-06-20T22:27:58+5:30

रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

The herd of slaughtered goats under the railway | रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

रेल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप

ल्वेखाली चिरडला शेळ्यांचा कळप
परळी जि.बीड: तालुक्यातील बरकतनगर भागात रेल्वेइंजीनखाली शेळ्यांचा कळप चिरडला गेला़ यात १६ शेळ्या जागीच ठार झाल्या़ ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झाली़
बरकतनगर भागातील रहिवासी ज्ञानोबा पौळ व भीमराव पौळ या दोघांनी आपल्या शेळ्या चारण्यासाठी शिवारात नेल्या होत्या़ सायंकाळी साडेसात वाजता वादळी वारे सुटले़ त्यानंतर ते शेळ्यांचा कळप हाकत घराकडे निघाले होते़ इतक्यात काही शेळ्या रेल्वेपटरीकडे गेल्या़ पाठोपाठ सर्वच शेळ्या पटरीच्या दिशेने पळाल्या़ याचवेळी परळीहून परभणीकडे एक रेल्वेइंजीन जात होते़ या इंजीनखाली चिरडून कळपातील सर्वच्या सर्व १६ शेळ्या जागीच गतप्राण झाल्या़ त्यामुळे पौळ कुटुंबिय उघड्यावर आले आहे़ या शेळ्यांची किंमत तब्बल तीन लाखांच्या घरात होती़

Web Title: The herd of slaughtered goats under the railway