देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे. एचडीएफसी बँकेची युपीआय (UPI) सेवा उद्या, म्हणजेच १३ डिसेंबर आणि त्यानंतर पुन्हा २१ डिसेंबर रोजी काही वेळेसाठी बंद राहणार आहे.
एचडीएफसी बँकेनं डिसेंबर २०२५ मध्ये आपली प्रणाली अपडेट आणि अधिक चांगली करण्यासाठी दोन वेळा मेंटेनन्सची घोषणा केली आहे, ज्यामुळे यूपीआय सेवा खंडित राहणार आहेत. या सिस्टीम मेंटेनन्सचा उद्देश प्रणालीला अधिक मजबूत करणं आणि भविष्यात सेवेतील अडथळे कमी करणं हा आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि यूपीआय सेवेचा वापर करत असाल, तर ही सेवा नेमकी कधी आणि किती वेळेपर्यंत बंद राहणार आहे, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
UPI सेवा कधी-कधी बंद राहणार?
उद्या, १३ डिसेंबर रोजी यूपीआय सेवा पहाटे २ वाजून ३० मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. याचा अर्थ ग्राहक उद्या एकूण ४ तास यूपीआय सेवेचा वापर करू शकणार नाहीत. त्यामुळे तुमची सर्व पेमेंट वेळेपूर्वीच पूर्ण करून घ्या.
यानंतर १३ डिसेंबरसोबतच आगामी २१ डिसेंबर रोजीही एचडीएफसी बँकेची यूपीआय सेवा बंद राहणार आहे. २१ डिसेंबर रोजी देखील यूपीआय सेवा पहाटे २ वाजून ३० मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत बंद राहील. त्यामुळे त्यानुसार तुमच्या सर्व पेमेंटचें वेळापत्रक ठरवा.
HDFC बँकेच्या कोणत्या सेवा प्रभावित होतील?
यूपीआय सोबतच, एचडीएफसी बँकेच्या इतर काही सेवा देखील या काळात उपलब्ध नसतील. यात खालील सेवांचा समावेश आहे:
एचडीएफसी बँकेच्या बचत आणि चालू खात्यातून होणारे यूपीआय ट्रान्झॅक्शन
एचडीएफसी बँकेच्या RuPay क्रेडिट कार्डनं केले जाणारे यूपीआय पेमेंट
HDFC MobileBanking ॲपद्वारे यूपीआय
मर्चंट यूपीआय कलेक्शन्स
यादरम्यान PayZapp वॉलेटचा वापर करा
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी या वेळेत PayZapp वॉलेटचा वापर करावा. PayZapp हे बँकेचे स्वतःचे मोबाईल वॉलेट आहे, जे मेंटेनन्सच्या वेळेतही सामान्यपणे काम करेल आणि लोक काही पेमेंट आणि ट्रान्सफर करू शकतील.
