lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ?

HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ?

hdfc bank : बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 अभियानाद्वारे 100 पेक्षा अधिक ठिकाणांवर 10,000 हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:18 PM2021-10-06T16:18:37+5:302021-10-06T16:19:10+5:30

hdfc bank : बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 अभियानाद्वारे 100 पेक्षा अधिक ठिकाणांवर 10,000 हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे.

hdfc bank has unveiled more than 10k offers on cards loans and emi check details | HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ?

HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ?

Highlights बँकेने अॅपल, अॅमेझॉन, शॉपर्स स्टॉप, एलजी, सॅमसंग, सोनी, टायटन आणि सेंट्रलसह व्यापाऱ्यांशी भागीदारी केली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही एचडीएफसी बँकचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने सणासुदीचा काळ (Festive season)  लक्षात घेता फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 ची घोषणा आहे. बँक कार्ड, लोन आणि सोपे ईएमआयवर 10,000 हून अधिक ऑफर (Festival offer) देणार आहे. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 अभियानाद्वारे 100 पेक्षा अधिक ठिकाणांवर 10,000 हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे.

या ऑफर अंतर्गत बँक ग्राहकांना दिलेल्या फायद्यांमध्ये प्रीमियम मोबाईल फोन आणि नो-कॉस्ट ईएमआयवर 22.5 टक्के कॅशबॅक देईल. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक उत्पादनांवर वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यासारख्या नो-कॉस्ट ईएमआय आणि तात्काळ डिलीव्हरीसह 10.25 टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे.

काय म्हटले आहे बँकेने?
बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक 7.50 टक्क्यांपासून शून्य फोरक्लोझर शुल्का आणि दुचाकी कर्जावर 100 टक्क्यांपर्यंत आणि व्याजदरावर चार टक्क्यांसह कार कर्ज घेऊ शकतात. त्याच वेळी, ट्रॅक्टर कर्जावर 90 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आणि वित्तपुरवठा आणि व्यावसायिक वाहन कर्जावर 50 टक्के प्रक्रिया शुल्कावर सूट आहे.

खरेदीची अपेक्षा
दरम्यान, आता परिस्थिती कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत, त्यामुळे या सणासुदीच्या काळात अधिक खरेदी होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत बँक ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेऊन आली आहे. बँकेने अॅपल, अॅमेझॉन, शॉपर्स स्टॉप, एलजी, सॅमसंग, सोनी, टायटन आणि सेंट्रलसह व्यापाऱ्यांशी भागीदारी केली आहे.

Web Title: hdfc bank has unveiled more than 10k offers on cards loans and emi check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.