Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?

पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?

HDFC Bank Share Price: सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सकाळी या बँकेच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. बँकेनं आठवड्याच्या शेवटी पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल, लाभांश आणि बोनस शेअर्स जाहीर केल्यानंतर ही वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:07 IST2025-07-21T12:07:54+5:302025-07-21T12:07:54+5:30

HDFC Bank Share Price: सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सकाळी या बँकेच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. बँकेनं आठवड्याच्या शेवटी पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल, लाभांश आणि बोनस शेअर्स जाहीर केल्यानंतर ही वाढ झाली.

HDFC bank First quarter results bonus and dividend announced bank s stock price up do you own it | पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?

पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?

HDFC Bank Share Price: सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सकाळी एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या किमतीत २% पेक्षा जास्त वाढ झाली. बँकेनं आठवड्याच्या शेवटी पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल, लाभांश आणि बोनस शेअर्स जाहीर केल्यानंतर ही वाढ झाली. बँकेनं ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत ५३,१७० कोटी रुपयांचा निव्वळ महसूल नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४०,५१० कोटी रुपयांपेक्षा ३१ टक्क्यांनी जास्त आहे.

दरम्यान, या उत्पन्नात बँकेच्या उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओमधून मिळालेला व्यवहार नफ्याचाही (९,१३० कोटी रुपये) समावेश होता. निव्वळ नफा सुमारे १८,१६० कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत १२% जास्त आहे आणि तो विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही चांगला आहे.

जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

निकाल चांगले का होते?

जेफरीज इंडिया सारख्या विश्लेषकांच्या मते, या उत्कृष्ट कामगिरीमागे काही प्रमुख कारणं होती. कर्जांमध्ये चांगली वाढ, ठेवींमध्ये मजबूत वाढ, व्याज मार्जिनमध्ये घट (निव्वळ व्याज मार्जिन किंवा एनआयएम) आणि मालमत्ते गुणवत्ता स्थिर राहणं ही कारणं होती. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनेही याला 'स्टेबल' तिमाही म्हटलंय.

काय म्हणाले एक्सपर्ट?

जेफरीज इंडियाची २,४०० रुपयांची टार्गेट प्राईज

जेफरीजच्या मते, एचडीएफसी बँक ही बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या सर्वात आवडत्या कंपन्यांपैकी (टॉप पिक) आहे. रेपो दर आणि ठेवी दरांमध्ये अलिकडेच झालेल्या कपातीचा परिणाम लक्षात घेता, त्यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज किंचित कमी केला आहे. पुढील तिमाहीत (Q2) व्याज मार्जिनवर (NIM) आणखी दबाव येण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यानंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यांनी या शेअरवर बाय रेटिंग कायम ठेवलं आहे आणि शेअरची टार्गेट प्राईज प्रति शेअर २,४०० रुपयांपर्यंत वाढवली (पूर्वी २,३४० रुपयांवरून) आहे.

मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार आहे की टॅक्स रिव्हर्सलमुळे नफा अपेक्षेपेक्षा थोडा चांगला झाला. मागील तिमाहीच्या तुलनेत व्याज मार्जिन (एनआयएम) ०.११% (११ बेसिस पॉइंट्स) नं कमी झालं आहे आणि दर कपातीच्या परिणामामुळे पुढील तिमाहीत ते आणखी कमी होऊ शकतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: HDFC bank First quarter results bonus and dividend announced bank s stock price up do you own it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.