HDFC Online Service : जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बँकेने आपल्या सिस्टिमच्या देखभालीसाठी (मेंटेनन्स) काही सेवा ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते वेळेत पूर्ण करून घ्यावे लागेल. नुकतेच बँकेने बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून २३ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ७ तासांसाठी काही सेवा बंद राहतील. हा मेंटेनन्स ग्राहकांना भविष्यात अधिक चांगल्या आणि वेगवान सेवा देण्यासाठी केला जात आहे.
कोणत्या सेवा बंद राहणार?
या ७ तासांच्या कालावधीत खालील सेवांवर परिणाम होईल..
- व्हॉट्सॲप बँकिंग : व्हॉट्सॲपवर मिळणारी 'चॅट बँकिंग' सेवा बंद राहील.
- एसएमएस बँकिंग : एसएमएसच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध नसतील.
- ऑटोमॅटिक आयव्हीआर फोन बँकिंग : फोन बँकिंगची ऑटोमॅटिक प्रणाली काम करणार नाही.
- ग्राहक सहाय्यता : ईमेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी काही ग्राहक सेवा बंद राहील.
कोणत्या सेवा सुरू राहणार?
- सर्व डिजिटल सेवा बंद होणार नाहीत. काही महत्त्वाच्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
- फोन बँकिंग एजंट : तुम्ही फोन करून थेट बँकेच्या प्रतिनिधीशी बोलू शकता.
- नेट बँकिंग आणि मोबाइल ॲप : HDFC बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाइल ॲप पूर्णपणे चालू राहील, तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता.
- पेझॅप आणि मायकार्ड्स : यांसारखी इतर ॲप्लिकेशन्सही कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करतील.
वाचा - KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
वेळेत काम पूर्ण करा!
बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, जर तुमचे वरील बंद होणाऱ्या सेवांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते २२ ऑगस्टच्या रात्री ११ वाजण्यापूर्वीच पूर्ण करा. त्यामुळे गैरसोय टाळता येईल. मेंटेनन्सचे काम पूर्ण झाल्यावर सर्व सेवा पुन्हा नियमितपणे सुरू होतील.