लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील लक्झरी कार सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वाढत्या प्रभावाला ‘जीएसटी २.०’ सुधारणांनंतर ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नव्या कररचनेमुळे इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीतील तफावत वाढल्याने, लक्झरी ईव्हीच्या विक्रीत सुमारे ३ टक्क्यांची घट झाली आहे.
आता ग्राहकांसाठी आयसीई इंधन म्हणजेच पेट्रोलवरील गाड्या अधिक परवडणाऱ्या ठरत आहेत. जीएसटी सुधारणांनंतर मध्यम व सुरुवातीच्या लक्झरी सेगमेंटमध्ये मोठे बदल झाले आहेत.
