Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

Google job : अमेरिकेतील महाकाय टेक कंपनी गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:49 IST2025-06-12T14:35:56+5:302025-06-12T14:49:23+5:30

Google job : अमेरिकेतील महाकाय टेक कंपनी गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

Google's Buyout Offer AI Reshapes Workforce Amidst Global Layoffs | नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

Google job : सध्या जगभरातील नोकरदार वर्ग गोष्टींमुळे चिंतेत आहे. एकीकडे जागतिक मंदीची छाया आणि दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाची जागा घेणार ही भीती. या दोन्ही कारणांमुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. आता यात दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास 'बायआउट' (Buyout) ऑफर आणली आहे. याचा अर्थ, जर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली, तर त्यांना एक चांगली रक्कम दिली जाईल.

गुगलने 'नॉलेज अँड इन्फॉर्मेशन', सेंट्रल इंजिनिअरिंग, मार्केटिंग, रिसर्च आणि कम्युनिकेशन यांसारख्या प्रमुख विभागांतील कर्मचाऱ्यांना ही ऑफर दिली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या कंपनीच्या धोरणाचाच हा एक भाग आहे.

२०२३ पासून कर्मचारी कपात सुरूच
'सीएनबीसी'च्या अहवालानुसार, गुगलने २०२३ मध्येच १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. तेव्हापासून कंपनी सतत कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. या नवीन बायआउट ऑफर अंतर्गत नेमके किती कर्मचारी नोकरी सोडतील, याची ठोस माहिती अजून समोर आलेली नाही.

गुगलने स्पष्ट केले आहे की, ही 'स्वैच्छिक निर्गमन कार्यक्रम' (Voluntary Exit Program) ऑफर फक्त अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठीच लागू असेल. विशेष म्हणजे, गुगलच्या काही विभागांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसपासून ५० मैलांच्या आत राहणाऱ्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कामगारांना आता ऑफिसमध्ये येऊन काम करणे अनिवार्य केले आहे.

खर्च कपात हेच प्राधान्य!
गुगलचे वित्त प्रमुख अनत अश्केनाझी यांनी ऑक्टोबरमध्येच सांगितले होते की, खर्च कपात करणे हे कंपनीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. ही बायआउट ऑफर अशा वेळी आली आहे, जेव्हा कंपनी २०२५ मध्ये एआयच्या पायाभूत सुविधांवर मोठा खर्च वाढवत आहे.

गुगलच्या ज्ञान आणि माहिती विभागात सुमारे २०,००० कर्मचारी आहेत. ऑक्टोबरमध्येच या युनिटची पुनर्रचना करण्यात आली होती. या विभागाचे प्रमुख निक फॉक्स यांनी नुकताच एक मेमो पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जे कर्मचारी कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून जावे. तर, जे कर्मचारी आपल्या कामाबद्दल उत्साही आहेत आणि चांगले काम करत आहेत, त्यांनी कंपनीतच राहावे.

वाचा - ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!

गुगलच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून, याचा कंपनीच्या भविष्यावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Google's Buyout Offer AI Reshapes Workforce Amidst Global Layoffs