lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! या तारखेपर्यंत Aadhaar Card मोफत अपडेट करता येणार, UIDAI वाढवली तारीख

खुशखबर! या तारखेपर्यंत Aadhaar Card मोफत अपडेट करता येणार, UIDAI वाढवली तारीख

आधार हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:59 AM2023-06-17T10:59:56+5:302023-06-17T11:00:37+5:30

आधार हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो.

Good news Aadhaar Card can be updated free of cost till 14th september UIDAI extended date know details and procedure | खुशखबर! या तारखेपर्यंत Aadhaar Card मोफत अपडेट करता येणार, UIDAI वाढवली तारीख

खुशखबर! या तारखेपर्यंत Aadhaar Card मोफत अपडेट करता येणार, UIDAI वाढवली तारीख

आधार हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. परंतु त्यात जर काही चूक असेल तर तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. दरम्यान, आता युआयडीएआयनं आधार मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यापूर्वी ही तारीख १४ जून होती. परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे.

UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. जर एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी केले गेले असेल आणि ते कधीही अपडेट केलं गेलं नसेल, तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करून तुमची डेमोग्राफीक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे. हे अपडेट कसं करायचं हे पाहू. 

असा करा पत्ता अपडेट

  • https://myaadhaar.uidai.gov.in/  या वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुमच्या डिटेल्सनं लॉग इन करा. त्यानंतर नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करा.
  • अपडेट आधार ऑनलाइन पर्यायावर क्लिक करा.
  • डेमोग्राफीक या ऑप्शन अंतर्गत अॅड्रेस हा पर्याय निवडा. आधार अपडेट करण्यासाठी कंटिन्यूवर क्लिक करा.
  • कागदपत्राची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. त्यानंतर त्या ठिकाणी मागितलेली इतर माहिती त्यात टाका.
  • यानंतर पेमेंटचा पर्याय येतो. परंतु १४ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे मोफत अपलोड करता येईल.
  • यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. तो सेव्ह करून ठेवा.


रिक्वेस्ट कशी ट्रॅक कराल
तुम्हाला एक युआरएन नंबर मिळेल. रिक्वेस्ट चेक करण्यासाठी तुम्ही https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus यावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्ही अपडेटचं स्टेटस तपासून पाहू शकता.

Web Title: Good news Aadhaar Card can be updated free of cost till 14th september UIDAI extended date know details and procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.