Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today on MCX: आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार उघडताच दरवाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:50 IST2026-02-27T10:49:17+5:302026-02-27T10:50:22+5:30

Gold Silver Price Today on MCX: आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार उघडताच दरवाढ झाली आहे.

Gold Silver rate Today 27 feb 2026 Gold and silver became expensive before Holi Silver became more expensive than 6 thousand quickly check the latest rate | Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today On MCX: आज २७ फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार) रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार उघडताच दरवाढ झाली आहे. MCX वर सोन्याची किंमत १,६०,१५१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २.५७% च्या वाढीसह २,७४,८५१ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर वाढत्या अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींना बळ मिळत आहे.

सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली?

गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत घसरणीसह १,५९,९६८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. म्हणजेच आज सोने १८३ रुपयांच्या तेजीसह उघडलं. दुसरीकडे, चांदी २,६८,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, ज्यामध्ये आज ६,३५१ रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू करारावर तोडगा न निघाल्याने बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असून, हे देखील या दरवाढीमागील एक कारण आहे.

आधी घरावर जप्ती आता अनिल अंबानींविरोधात CBI नं दाखल केला नवा खटला; २२०० कोटींचं प्रकरण

विक्रमी उच्चांकापेक्षा दर किती कमी आहेत?

२९ जानेवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतींनी आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर (All-time high) गाठला होता. त्यावेळी सोन्याचा दर १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ आणि चांदीचा दर ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. म्हणजेच आपल्या ऐतिहासिक विक्रमापेक्षा सोने सध्या २०,०३२ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १,४५,१४९ रुपये प्रति किलोनं खाली आहे. मात्र, 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यासारख्या अनेक बाजार तज्ज्ञांचे मते, २०२६ मध्येच सोन्या-चांदीचे दर नवीन विक्रम प्रस्थापित करतील.

दिल्लीतील सोन्याचे नवे दर

२४ कॅरेट सोने: १,६१,८२० रुपये प्रति १० ग्रॅम.

२२ कॅरेट सोने: १,४८,३४० रुपये प्रति १० ग्रॅम.

१८ कॅरेट सोने: १,२१,४०० रुपये प्रति १० ग्रॅम.

चांदी (१ किलो): २,८४,९०० रुपये.

Web Title : होली से पहले सोना-चांदी महंगा; चांदी में भारी उछाल।

Web Summary : एमसीएक्स पर सोना और चांदी की कीमतों में तेजी आई। चांदी में ₹6,351 प्रति किलो की भारी वृद्धि हुई। वैश्विक अनिश्चितता और परमाणु वार्ता में रुकावट से कीमतों में बढ़ोतरी हो रही है। रिकॉर्ड ऊंचाई से अभी भी नीचे, विशेषज्ञों ने 2026 में नई ऊंचाइयों की भविष्यवाणी की है।

Web Title : Gold and silver prices surge before Holi; silver up significantly.

Web Summary : Gold and silver prices rose sharply on MCX. Silver saw a substantial increase of ₹6,351 per kg. Global uncertainty and stalled nuclear talks are fueling the price hike. While still below record highs, experts predict new peaks in 2026.