Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Silver Rate 18 March 2026: सोने आणि चांदीच्या किमतीत आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:02 IST2026-03-18T14:59:12+5:302026-03-18T15:02:29+5:30

Gold Silver Rate 18 March 2026: सोने आणि चांदीच्या किमतीत आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver rate Today 18 march 2026 Big drop in gold and silver prices know what are the new rates before buying | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Silver Rate 18 March 2026: सोने आणि चांदीच्या किमतीत आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,५२५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मंगळवारी हा दर १,५५,६६८ रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात १४३ रुपयांची घट झाली आहे. 

२२ कॅरेट सोन्याचा विचार केल्यास, आज हा दर १,५४,९०२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. यातही १४३ रुपयांची घसरण झाली आहे; मंगळवारी याची किंमत १,५५,०४५ रुपये होती.

१८ कॅरेट सोन्याचा दर आज बुधवारी १,४२,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जो मंगळवारच्या १,४२,५९२ रुपयांच्या तुलनेत १३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे, bullions.co.in नुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११० रुपयांची घट होऊन तो १,५६,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकला जात आहे.

आजचा चांदीचा भाव

आयबीजेए (IBJA) नुसार, आज एक किलो चांदीची किंमत २,५०,१६३ रुपये आहे. मंगळवारी हा दर २,५२,३४० रुपये प्रति किलो होता, म्हणजेच आज चांदीच्या दरात २,१७७ रुपये प्रति किलोची मोठी घट झाली आहे. मात्र, bullions.co.in नुसार चांदी २,५४,७६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून यात ८३० रुपयांची तेजी दिसून आली आहे. विशेष म्हणजे, आयबीजेए दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते.

आज सोन्या-चांदीचे दर का घसरले?

तज्ज्ञांच्या मते, फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या १८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवले जाऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. बाजारानं आधीच हा अंदाज बांधला असल्यानं, जर परिस्थिती कायम राहिली तर त्याचा परिणाम मर्यादित असू शकतो. मात्र, जेरोम पॉवेल यांची कडक भूमिका, कमकुवत आर्थिक वाढीचे संकेत आणि महागाईचे वाढते अंदाज बाजारातील वातावरणावर परिणाम करू शकतात.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में भारी गिरावट: खरीदने से पहले जानें नए रेट

Web Summary : आज सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। आईबीजेए के अनुसार, सोने में ₹143 प्रति 10 ग्राम की गिरावट आई। चांदी ₹2,177 प्रति किलो गिरी। महंगाई के खतरे के कारण दर में कटौती की संभावना नहीं है।

Web Title : Gold, Silver Prices Plunge: Know the Latest Rates Before Buying

Web Summary : Gold and silver prices witnessed a significant drop today. Gold decreased by ₹143 per 10 grams. Silver plummeted by ₹2,177 per kg, according to IBJA. Rate cuts are unlikely due to inflation risks.