Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Silver Gold Rate Today: एका झटक्यात चांदी ₹३०,२३० नं स्वस्त; सोनं ₹३६०० पेक्षा अधिक नं घसरलं, पाहा काय आहेत नवे दर

Silver Gold Rate Today: एका झटक्यात चांदी ₹३०,२३० नं स्वस्त; सोनं ₹३६०० पेक्षा अधिक नं घसरलं, पाहा काय आहेत नवे दर

Gold Silver Rate 5 Feb.: दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:52 IST2026-02-05T14:49:09+5:302026-02-05T14:52:46+5:30

Gold Silver Rate 5 Feb.: दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver proce 5 Feb 2026 Silver drops by rs 30230 in one fell swoop Gold falls by more than rs 3600 see what are the new rates | Silver Gold Rate Today: एका झटक्यात चांदी ₹३०,२३० नं स्वस्त; सोनं ₹३६०० पेक्षा अधिक नं घसरलं, पाहा काय आहेत नवे दर

Silver Gold Rate Today: एका झटक्यात चांदी ₹३०,२३० नं स्वस्त; सोनं ₹३६०० पेक्षा अधिक नं घसरलं, पाहा काय आहेत नवे दर

Gold Silver Rate 5 Feb.: दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे सोन्या-चांदीचे दर कोसळले आहेत. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने ३,६१७ रुपयांनी स्वस्त झालं, तर चांदीच्या दरात एकाच वेळी ३०,२३० रुपयांची मोठी घट झाली आहे.

आजचे ताजे दर 

आज सराफा बाजारात विना जीएसटी सोनं १,५३,०१२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं, तर चांदीचा दर प्रति किलो २,५२,२३२ रुपये इतका राहिला. जीएसटीसह विचार केल्यास, सोन्याचा भाव १,५७,६०२ रुपये आणि चांदी २,५९,७९८ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय प्लॅटिनमच्या दरातही ४,५६५ रुपयांची घसरण होऊन तो ६७,८९० रुपयांवर आला आहे.

कार लोन संपलं? आता घरबसल्या मोबाईलवरुन अपडेट करा RC; RTO च्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, पाहा प्रोसेस

विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण

बुधवारी विना जीएसटी चांदी २,८२,४६२ रुपयांवर तर सोनं १,५६,६२५ रुपयांवर बंद झालं होतं. सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर १,७६,१२१ रुपये होता, त्या तुलनेत सोनं आता २३,१०९ रुपयांनी स्वस्त झालंय. तसंच चांदी २९ जानेवारीच्या आपल्या ३,८५,९३३ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून १,३३,७०१ रुपयांनी घसरली आहे. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आले आहेत.

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोनं: ३,३१० रुपयांनी स्वस्त होऊन १,४०,१५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह याची किंमत १,४४,३६३ रुपये आहे.

१८ कॅरेट सोनं: २,७१० रुपयांच्या घसरणीसह आज १,१४,७५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह हा दर १,१८,२०१ रुपये इतका आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे भाव

२३ कॅरेट सोनं: ३,५९९ रुपयांनी घसरून १,५२,३९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,५६,९७० रुपये झाली आहे.

१४ कॅरेट सोनं: २,११४ रुपयांच्या घसरणीसह ८९,५१२ रुपयांवर उघडलं असून जीएसटीसह हे सोनं ९२,१९७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे.

Web Title : सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट: जानिए आज के नए रेट

Web Summary : तेजी के बाद, अमेरिका-ईरान तनाव कम होने और डॉलर मजबूत होने से सोने-चांदी के दाम गिरे। सोना ₹3,617 सस्ता, चांदी ₹30,230 घटी। आज के रेट: सोना ₹1,53,012 (बिना जीएसटी) प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,52,232 (बिना जीएसटी) प्रति किलो।

Web Title : Gold and silver prices crash: Check the latest rates now.

Web Summary : After a surge, gold and silver prices sharply declined due to easing US-Iran tensions and a stronger dollar. Gold fell by ₹3,617, while silver plummeted by ₹30,230. Current rates: Gold ₹1,53,012 (ex GST) per 10 grams, silver ₹2,52,232 (ex GST) per kg.