Gold Silver Rate Today 8 December: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. चांदीच्या दरात ८९० रुपयांची वाढ झाली असून ती १७९१०० रुपये प्रति किलो वर उघडली. जीएसटीसह चांदीची किंमत आता १८४४७३ रुपये प्रति किलो झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटी वगळता चांदीचा भाव १७८२१० रुपये प्रति किलो होता, तर सोन्याचा भाव जीएसटी वगळता १२८५९२ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२८६९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३२५५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १२१३६५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९९३७२ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या ऑल टाईम हाय (१३०८७४ रुपये) पेक्षा केवळ २१८३ रुपये कमी राहिला आहे. तर, चांदीचा भाव आज ८ डिसेंबरला १७९१०० रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर (All Time High) पोहोचला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जारी केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ९९ रुपयांनी वाढून १२८१२२ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३१९६५ रुपये झाली आहे. यामध्ये अजून मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ४१ रुपयांनी वाढून ११७८३१ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे. जीएसटीसह हा भाव १२१३६५ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव ३४ रुपयांच्या तेजीसह ९६४७८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९९३७२ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याच्या दरातही २७ रुपयांची वाढ झाली आहे. आज हा दर ७५२५३ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७७५१० रुपयांवर आहे.
