Gold Silver Rate Today MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आज म्हणजेच १० मार्च २०२६, मंगळवारी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव १,६१,६०० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,७६,४१० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर ही तेजी आली आहे. कालच कच्च्या तेलाच्या किमतीनं गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली होती, मात्र आज झालेल्या घसरणीचा परिणाम कमोडिटी बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
सोने आणि चांदीच्या भावात झालेली वाढ
सोनं: सोमवारी देशांतर्गत वायदा बाजारात सोनं १,६०,३८७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झालं होतं. आज बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत १,२१३ रुपयांची वाढ झाली.
चांदी: सोमवारी एमसीएक्सवर चांदी २,६७,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज चांदीच्या किमतीत तब्बल ८,८१० रुपये प्रति किलोची तेजी पाहायला मिळाली. सोन्या-चांदीच्या दरातील या वाढीमागे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट हे मुख्य कारण आहे.
प्रमुख शहरांमधील सोने आणि चांदीचे ताजे दर
- मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६१,६७० रुपये, २२ कॅरेट १,४८,१९० रुपये आणि १८ कॅरेट १,२१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा भाव २,७९,९०० रुपये प्रति किलो आहे.
- दिल्ली: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६१,८२० रुपये आणि १८ कॅरेट १,२१,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चांदी २,७९,९०० रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.
- बंगळुरू: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६१,६७० रुपये आणि २२ कॅरेट १,४८,१९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीची किंमत २,७९,९०० रुपये प्रति किलो आहे.
- कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा दर १,६३,६२० रुपये आणि २२ कॅरेट १,४८,१९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदी २,७९,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
- चेन्नई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६३,०८० रुपये, २२ कॅरेट १,४९,४९० रुपये आणि १८ कॅरेट १,२९,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. येथे चांदीचा भाव २,८९,९०० रुपये प्रति किलो आहे.
