Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार

Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार

Gold Silver Price 10 September: आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:47 IST2025-09-10T13:47:54+5:302025-09-10T13:47:54+5:30

Gold Silver Price 10 September: आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price 10 September 2025 Gold and silver prices fell today after a big rise; See how much you will have to spend for 14 to 24 carats now | Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार

Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार

Gold Silver Price 10 September: आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. जीएसटीशिवाय सोनं फक्त ६६ रुपयांनी स्वस्त झालं आहे आणि ते प्रति १० ग्रॅम १०९४०९ रुपयांवर आलंय. त्याच वेळी, चांदीचा दर प्रति किलो ६२६ रुपयांनी कमी झाला आहे. सप्टेंबरमध्ये, सोने प्रति १० ग्रॅम ४६१७ रुपयांनी महाग झालंय. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो ८२९४ रुपयांनी वाढ झाली.

आयबीजेएच्या दरांनुसार, आज जीएसटीशिवाय चांदीचा भाव १२४१४४ रुपयांवर उघडला. ऑगस्टच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोनं १०२३८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झालं होतं. चांदी देखील ११७५७२ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या

जीएसटीनंतर, सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो १२७८६८ रुपये झाला आहे. तर, सोनं प्रति १० ग्रॅम ११२६९१ रुपये झालंय. आयबीजेएनुसार, मंगळवारी, जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो १२४७७० रुपये झाला. तर, सोनं प्रति १० ग्रॅम १०९४७५ रुपये झालं.

कॅरेटनुसार आजचा सोन्याचा भाव

आज २३ कॅरेट सोन्याचा भावही ६६ रुपयांनी घसरून १०८९७१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता ११२२४० रुपये आहे. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६० रुपयांनी घसरून १००२१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह तो १०३२२५ रुपये झालाय.
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ४९ रुपयांनी घसरून ८२०५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला आणि जीएसटीसह तो ८४५१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६५९२४ रुपयांवर पोहोचलाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold Silver Price 10 September 2025 Gold and silver prices fell today after a big rise; See how much you will have to spend for 14 to 24 carats now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.