Gold Price Today 26 Feb 2026 आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी देशातील बहुतांश शहरांमधील सराफा बाजारात सोन्याची चमक काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. bullions.co.in नं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ६०० रुपयांनी स्वस्त होऊन १,६०,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.
विविध शहरांमधील दरांचा विचार केल्यास, दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घट झाली असून ते १,६०,३९० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकले जात आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईत सोन्याचे दर ६१० रुपयांनी स्वस्त होऊन १,६०,६६० रुपये आणि कोलकात्यात ६२० रुपयांनी कमी होऊन १,६०,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आलेत.
प्रत्येक शेअरवर ७५ रुपयांचा डिविडेंड; कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
इतर शहरांमधील बाजाराची स्थिती
सोन्याच्या दरातील घसरण इतरही शहरांत दिसून आली आहे. चेन्नईमध्ये ६२० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा दर १,६१,१२० रुपये आणि लखनौमध्ये ६१० रुपयांच्या घसरणीसह १,६०,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. इंदूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१० रुपयांनी स्वस्त होऊन १,६०,८३० रुपयांवर पोहोचला, तर जयपूरमध्ये ७७० रुपयांची मोठी घट होऊन हा दर १,६०,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. bullions.co.in वरील हे दर वेळोवेळी बदलत असतात याची नोंद घेणे आवश्यक आहे.
आयबीजेए (IBJA) नुसार सोन्याचे ताजे दर
आयबीजेएने (IBJA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज २६ फेब्रुवारी रोजी 'गोल्ड ९९९' चा भाव जीएसटीशिवाय बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत केवळ ३५ रुपयांनी महाग होऊन १,५९,०४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. या दरानुसार, आता सोनं सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या उच्चांकी विक्रमापेक्षा १७,०७८ रुपयांनी स्वस्त आहे. जीएसटीसह सोन्याचा आजचा भाव १,६३,८१४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झालाय.
१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर
सध्याच्या बाजारभावानुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,५०,०५३ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,२२,८६० रुपयांवर पोहोचला. बुधवारी आयबीजेएवर 'गोल्ड ९९९' चा दर जीएसटीशिवाय १,५९,००८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. आयबीजेए दिवसातून दोनदा सोन्याचे दर प्रसिद्ध करते.
