Gold Price Hike : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीच्या शक्यतेमुळे सोन्याच्या दरात सतत घसरण होत होती. मात्र, मंगळवारी सोन्याने पुन्हा उसळी घेतली असून, भारतात सोन्याच्या किमतीत तब्बल १,१४० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात चांदी २,३०० रुपयांपेक्षा जास्त महाग झाली.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (१ जुलै २०२५)
मुंबई:
२२ कॅरेट सोने: ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने: ९८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम
दिल्ली:
२२ कॅरेट सोने: ९०,३५० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने: ९८,५५० रुपये प्रति १० ग्रॅम
चेन्नई:
२२ कॅरेट सोने: ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने: ९८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम
कोलकाता:
२२ कॅरेट सोने: ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने: ९८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम
चांदीचा भाव आणि MCX/COMEX वरील स्थिती
मुंबईत आज चांदीचा भाव १,१०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ ऑगस्ट २०२५ साठी डिलिव्हरी सोन्याचा भाव ०.९३ टक्क्यांनी वाढून ९६,९६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, ५ सप्टेंबर २०२५ साठी डिलिव्हरी चांदीचा भाव ०.६४ टक्क्यांनी वाढून १,०६,९७३ रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारपेठेतही सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. COMEX वर सोने १.०९ टक्क्यांनी महाग होऊन ३३४३.८० डॉलर प्रति औंस झाले, तर चांदीची किंमत ०.४१ टक्क्यांनी वाढून ३६ डॉलर प्रति औंस झाली.
सोने-चांदी खरेदी करताना काय काळजी घ्याल?
तुम्ही जेव्हा सोन्याचे दागिने खरेदी करता, तेव्हा त्यांच्या किमतीवर ३% जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्ज (घडणावळ) वेगळा लागतो, ज्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत वाढते. दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी त्यावर असलेला 'हॉलमार्क' नक्की तपासा. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे अधिकृत चिन्ह आहे.
तुमच्या शहरातील दर कसे तपासाल?
तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याचे आणि चांदीचे दर सहज तपासता येतात. यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ या क्रमांकावर एक मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय, तुम्ही ibjarates.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही दर तपासू शकता.