lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, झटपट जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव..

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, झटपट जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव..

Gold Rate Today 12 March 2021: सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण, काय आहे लेटेस्ट दर जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:21 PM2021-03-12T19:21:15+5:302021-03-12T19:28:33+5:30

Gold Rate Today 12 March 2021: सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण, काय आहे लेटेस्ट दर जाणून घ्या..

gold rate 12 march 2021 gold price down by 291 rs here are latest rates | Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, झटपट जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव..

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, झटपट जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव..

Gold Rate Today, 12 March 2021: डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती घसरल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी समजली जात आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमसाठी २९१ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एका किलो चांदीची किंमत तब्बल १,०९६ रुपयांची घसरली आहे. (Gold Rate Fall 12 March 2021 latest Rate)

एमसीएक्सवरील माहितीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर ४४ हजार ३५० रुपयांवरुन ४४,०५९ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात प्रति औंस १,७०७ डॉलरवर पोहोचली आहे. 

सोन्याच्या दर ऑगस्ट २०२० मध्ये तब्बल ५६,२०० प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. त्यात तब्बल २० टक्क्यांची घट आज नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२१ या वर्षात म्हणजेच गेल्या दोन महिन्यात ५ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. दरम्यान, १४ मे रोजी अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून दरांत घट होण्याची ५ कारणे...

  • कोरोनावर प्रभावी लस आल्याने
  • जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजी आल्यामुळे
  • अमेरिकेत सरकारी बॉण्ड्सना मागणी वाढल्याने
  • अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे
  • या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने लोकांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली

Web Title: gold rate 12 march 2021 gold price down by 291 rs here are latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.