lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

शुक्रवारी अमेरिकेत १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरले सोन्याचे दर

By जयदीप दाभोळकर | Published: January 9, 2021 03:52 PM2021-01-09T15:52:35+5:302021-01-09T15:54:46+5:30

शुक्रवारी अमेरिकेत १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरले सोन्याचे दर

Gold prices slump 2000 rupees per 10 gram in a day silver rates crash 6000 rupees know new rates | एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

Highlightsजागतिक बाजारपेठेचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाममुंबईत सोन्याचे दर ५० हजारांच्याही खाली

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली. जागतिक बाजारपेठेत झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही जाणवला. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील वायदा दरात ४ टक्क्यांची म्हणजेच २,०५० रूपयांची घसरण होऊन दर ४८,८१८ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. तर चांदीच्या दरातही ६,१०० रूपयांची म्हणजे ८.८ टक्क्यांची मोठी घसरण होऊन ते ६३,८५० रूपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात ४ टक्क्यांची घट होऊन ते १,८३३.८३ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरचं वाढलेलं मूल्य आणि बॉन्ड यील्डमधील तेजीमुळे सोनच्या दरात घरसण झाल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकन सीनेटवरील डेमोक्रेडच्या नियंत्रणानं मोठ्या प्रोत्साहनपर उपाययोजनांची शक्यता वाढली आहे. तसंच बॉन्ड यील्डही मार्च महिन्यापासून आपल्या १० वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. शुक्रवारी अमेरिकेत सोन्याचे दर हे १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरल्याचं पाहायला मिळालं. 

"सोवरन गोल्ड बॉन्डच्या दहाव्या टप्प्याचं सुरू वर्षासाठी मूल्य ५० रूपये प्रति १० ग्राम सूट सह ५,१०४ रूपये प्रति १० ग्राम ऑनलाइन सबस्क्रिप्शनसाठी निश्चित करण्यात आलं आहे. सोवरन गोल्ड बॉन्ड किरकोळ गुंतवणूकदारांच्या आवडत्या पर्यायांपैकी एक आहे. सोवरन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये दुहेरी लाभ आहेत. कारण गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीवर दर वर्षाला २य५ टक्के निश्चित व्याज मिळतं आणि बॉन्डचा कालावधी पूर्ण होतेवेळी सोन्याच्या किंमतीतही वाढ होते," असं मत मिलवूड केन इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी निश भट्ट यांनी सांगितलं.

व्हाईट हाऊसमध्ये येणार्‍या प्रशासनाकडून अतिरिक्त वित्तीय प्रोत्साहन, जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती आणि लसीकरणाच्या प्रक्रियेच्या वेगाचाही सोन्याच्या दरावर प्रभाव पाडेल, असेही ते म्हणाले.

२२ कॅरेट सोन्याचे काय आहेत नवे दर ?

दिल्ली - ४९,६५० रुपये

मुंबई - ४९,८२० रुपये

कोलकाता - ५०,१९० रुपये

चेन्नई - ४७,९२० रुपये

बंगळुरू - ४७,५०० रूपये
 

Read in English

Web Title: Gold prices slump 2000 rupees per 10 gram in a day silver rates crash 6000 rupees know new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.