lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले...

Gold Price Today: लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले...

व्याजदर वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यांच्या घरात पुढील काळात लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:49 AM2022-05-18T08:49:09+5:302022-05-18T08:50:57+5:30

व्याजदर वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यांच्या घरात पुढील काळात लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Gold Price Today: Lagnasarai! The opportunity to buy cheap gold after three months; Gold Rates are falling ... | Gold Price Today: लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले...

Gold Price Today: लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले...

सोन्याच्या दराने गेल्या काही दिवसांपासून कहर केला होता. कोरोनाकाळात सोन्याचा प्रति तोळा जेवढा भाव झाला होता, तेवढ्याच उंचीवर सोने जाऊन आले आहे. यामुळे ऐन लग्नसराईत सोन्याने विवाहेच्छुकांचे डोळे पांढरे केले होते. परंतू, आता सोन्याचा दर गेल्या तीन महिन्यांच्या निच्चांकावर आला आहे. यामुळे जवळपास सहा ते सात हजारांनी स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आली आहे. 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने जगभरात अनिश्चितता पसरली होती. यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा 56 हजार रुपयांवर गेला होता. आता सोन्याच्या दरात घसरण झाली असून सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या दर 49,937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. आज बाजार उघडण्याआधी सोन्याचा दर 50,181 रुपयांवर आहे. 
जाणकारांनुसार सोन्याची टंचाई निर्माण होऊ शकते. अनेक सोनारांनी दर वाढल्याने सोने खरेदी कमी केली आणि आपल्याकडील स्टॉकही भरला नव्हता. आता दर कमी झाल्याने अनेकजण आपल्याकडील स्टॉक भरतील. दर कमी झाला तर माल विकला जाईल, यामुळे ज्वेलरी सेक्टरमध्ये तेजीची आशा आहे.

व्याजदर वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यांच्या घरात पुढील काळात लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. सोन्या, चांदीच्या दरात आणखी घट होण्याची संभावना आहे. हा दर ४८००० ते ५०००० च्या आसपास येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आता सोनार दिवाळीसाठीच्या सोन्याची खरेदी सुरु करतील. दिवाळीत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीसाठी कंपन्यांकडून ऑर्डर स्वीकारल्या जातील. 

Web Title: Gold Price Today: Lagnasarai! The opportunity to buy cheap gold after three months; Gold Rates are falling ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं