Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा किती महागलं सोनं; १४ ते २४ कॅरेट Gold चे नवे दर

सोन्याच्या दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा किती महागलं सोनं; १४ ते २४ कॅरेट Gold चे नवे दर

Gold Rate Today 19 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्याचा नवा दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:59 IST2026-02-19T14:56:47+5:302026-02-19T14:59:41+5:30

Gold Rate Today 19 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्याचा नवा दर.

Gold Price Today 19 feb 2026 Big change in gold price see how expensive gold is before buying New prices of 14 to 24 carat gold | सोन्याच्या दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा किती महागलं सोनं; १४ ते २४ कॅरेट Gold चे नवे दर

सोन्याच्या दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा किती महागलं सोनं; १४ ते २४ कॅरेट Gold चे नवे दर

Gold Rate Today 19 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठा बदल पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ३,१५१ रुपयांनी वधारला असून जीएसटीशिवाय तो १,५४,७३५ रुपये प्रति १० ग्रॅम या दरावर उघडला. बुधवारी २४ कॅरेट गोल्ड जीएसटीशिवाय १,५१,५८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. हे दर 'आयबीजेए'द्वारे (IBJA) जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते; एकदा दुपारी १२ किंवा सव्वा बाराच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सध्याचे दर पाहता, सोन्याचा भाव आता सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापासून केवळ २१,३८६ रुपयांनी स्वस्त राहिला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर आज १,५९,३७७ रुपयांवर पोहोचलाय. सोन्यासोबतच प्लॅटिनमच्या दरातही मोठी वाढ झाली असून, तो ३,८४२ रुपयांच्या तेजीसह ६५,९२२ रुपयांवर पोहोचला आहे.

TATA चा मोठा धमाका! TCS आणि Sam Altman ची 'महायुती', AI च्या जगात भारताची 'महाआघाडी'

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे आजचे दर

कॅरेटनुसार सोन्याच्या भावाचा विचार केल्यास, आज २२ कॅरेट सोन्याचा दर २,८८६ रुपयांच्या वाढीसह १,४१,७३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह हा दर १,४५,९८९ रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्यामध्येही २,३६३ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून, आज तो १,१६,०५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटीसह याची किंमत १,१९,५३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर

१४ कॅरेट सोन्याचा दर १,८४३ रुपयांनी वधारून ९०,५२० रुपयांवर उघडला असून जीएसटीसह हा दर ९३,२३५ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. यासोबतच आज २३ कॅरेट सोनंदेखील ३,१३८ रुपयांच्या उसळीसह १,५४,११५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह या सोन्याची किंमत आता १,५८,७३८ रुपये झाली आहे.

Web Title : सोने की कीमतों में उछाल: खरीदने से पहले आज के नवीनतम दरें जांचें!

Web Summary : आज सोने की कीमतों में भारी उछाल आया, 24 कैरेट सोने में ₹3,151 की वृद्धि हुई। कैरेट के अनुसार कीमतें अलग-अलग हैं, 22 कैरेट ₹1,41,737 और 18 कैरेट ₹1,16,051 प्रति 10 ग्राम पर है। प्लैटिनम में भी उल्लेखनीय वृद्धि हुई, जो ₹65,922 तक पहुंच गई।

Web Title : Gold Prices Surge: Check Latest Rates Before Buying Today!

Web Summary : Gold prices soared today, with 24-carat gold rising by ₹3,151. Prices vary by carat, with 22-carat at ₹1,41,737 and 18-carat at ₹1,16,051 per 10 grams. Platinum also saw a significant increase, reaching ₹65,922.