Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

Gold-Silver Weekly Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना, चांदीची चमकही सतत वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:15 IST2025-09-14T13:59:43+5:302025-09-14T14:15:57+5:30

Gold-Silver Weekly Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना, चांदीची चमकही सतत वाढत आहे.

Gold Price Jumps by ₹3,369; Check the Latest Rates for All Karats | सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

Gold-Silver Weekly Update: सोन्याच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दरांमध्ये किरकोळ घसरण दिसली असली, तरी त्यानंतर सोन्याने विक्रमी वेगाने धाव घेत केवळ एकाच आठवड्यात नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दरातील हा बदल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरच नाही, तर देशांतर्गत बाजारातही सोने महागले आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव वाढला
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या ५ सप्टेंबर रोजी ३ ऑक्टोबरची एक्सपायरी असलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत १,०७,७२८ रुपये प्रति १० ग्रॅम होती. मात्र, १२ सप्टेंबर रोजी ही किंमत १,०९,३५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली. यानुसार, सोन्याच्या वायदा भावात आठवड्याभरात १,६२८ रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ झाली आहे.

देशांतर्गत बाजारातही सोन्याची चमक वाढली
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटवरील दरांनुसार, देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०६,३३८ रुपये होती, ती १२ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत *१,०९,७०७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. म्हणजेच, या एका आठवड्यात सोने ३,३६९ रुपये प्रति १० ग्रॅमने महागले आहे.

इतर कॅरेटच्या सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १२ सप्टेंबर रोजी विविध कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे होते.
 

सोन्याचे प्रकारकिंमतप्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने १,०९,७०७ रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोने१,०७,०७० रुपये प्रति १० ग्रॅम
२० कॅरेट सोने९७,६४० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोने८८,८६० रुपये प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट सोने ७०,७६० रुपयेप्रति १० ग्रॅम


हे दर जीएसटी आणि घडणावळ (मेकिंग चार्जेस) वगळून आहेत, जे प्रत्यक्षात दागिने खरेदी करताना वाढतात.

वाचा - तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

चांदीच्या दरातही मोठी वाढ
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ सुरूच आहे. चांदीनेही गेल्या आठवड्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ५ सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव १,२३,१७० रुपये होता, तो १२ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत १,२८,००८ रुपये प्रति किलो वर पोहोचला. म्हणजेच, आठवड्याभरात एक किलो चांदीच्या दरात ४,८३८ रुपयांचा मोठा बदल दिसून आला आहे.
 

Web Title: Gold Price Jumps by ₹3,369; Check the Latest Rates for All Karats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.