Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने १० महिन्यांच्या नीचांकावर

सोने १० महिन्यांच्या नीचांकावर

स्टॉकिस्टांकडून सातत्याने विक्री झाल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव १७० रुपयांच्या घसरणीसह २८,१०० रुपये प्रतितोळा झाला

By admin | Updated: May 28, 2014 03:45 IST2014-05-28T03:45:08+5:302014-05-28T03:45:08+5:30

स्टॉकिस्टांकडून सातत्याने विक्री झाल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव १७० रुपयांच्या घसरणीसह २८,१०० रुपये प्रतितोळा झाला

Gold falls to 10-month low | सोने १० महिन्यांच्या नीचांकावर

सोने १० महिन्यांच्या नीचांकावर

नवी दिल्ली : स्टॉकिस्टांकडून सातत्याने विक्री झाल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव १७० रुपयांच्या घसरणीसह २८,१०० रुपये प्रतितोळा झाला. ही गेल्या दहा महिन्यांची खालची पातळी आहे. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी न मिळाल्याने चांदीचा भावही ५० रुपयांनी घसरून ४१,४०० रुपयांवर आला. स्टॉकिस्टांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात मंदी राहिली. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात निवडक व्यापारी समूहांसाठी सोने आयातीवरील नियमांत सूट जाहीर केल्यामुळे बाजारात हा कल दिसून आला. बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने निर्यातीला चालना देण्यासाठी सोन्याच्या खरेदीसाठी ही सूट दिली. आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापर्‍यांकडून चांगली मागणी झाली नाही. यामुळे सोन्याच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या जुलै महिन्यात चालू खात्यातील वाढत्या तुटीवर लगाम घालणे आणि रुपयाची घसरण रोखण्यासाठी सोन्याच्या आयातीवर निर्बंध घातले होते. रिझर्व्ह बँकेने आयातीला निर्यातीशी जोडून २०:८० हा फॉर्म्युला सुचविला होता. ही सुविधा केवळ काही बँकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २८,१०० आणि २७,९०० रुपये प्रतितोळा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold falls to 10-month low