Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!

गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!

Gold ETF Turns Multibagger : जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. कारण गुंतवणूकदार महागाई आणि भू-राजकीय तणावाच्या काळात सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:01 IST2025-10-09T14:50:30+5:302025-10-09T15:01:28+5:30

Gold ETF Turns Multibagger : जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. कारण गुंतवणूकदार महागाई आणि भू-राजकीय तणावाच्या काळात सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानतो.

Gold ETF Turns Multibagger Nippon India Gold BeES Delivers 950% Return in 18 Years | गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!

गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!

Gold ETF Turns Multibagger : एका बाजूला शेअर बाजारात दिग्गज कंपन्यांचे स्टॉक्स आपटत आहे. तर दुसरीकडे सोन्याची घोडदौड अजूनही सुरुच आहे. विशेषतः गोल्ड ईटीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीने जबरदस्त परतावा दिला आहे. देशातील सर्वात जुना गोल्ड ईटीएफ, निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्डने २००७ मध्ये लाँच झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ९५०% चा स्फोटक परतावा दिला आहे. याचा अर्थ, जर एखाद्या व्यक्तीने १८ वर्षांपूर्वी या ईटीएफमध्ये १० लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते!

सोने विक्रमी पातळीवर का?
सध्या जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठत आहेत.
भारतातील दर: फ्युचर मार्केटमध्ये सोन्याची किंमत १.२२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेली आहे, तर चांदीने १.५ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे.
जागतिक दर: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ४,००० डॉलर प्रति औंसच्या पुढे व्यवहार करत आहे.
महागाई, भू-राजकीय तणाव आणि शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे धाव घेत आहेत.

गोल्ड ईटीएफचा 'धमाकेदार' परतावा

  • गुंतवणूकदारांचा सोन्यातील विश्वास सातत्याने वाढत आहे. निप्पॉन इंडिया गोल्ड बीईएसमध्ये सध्या २४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
  • गेल्या एका वर्षात यात ५६% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
  • १८ वर्षांच्या कालावधीत हा ईटीएफ १३.५% CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) सह ९५०% पर्यंत वाढला आहे.
  • या विक्रमी परताव्याने डॉट-कॉम क्रॅश, २००८ चे आर्थिक संकट आणि २०२० चा कोविड शॉक यांसारख्या मोठ्या संकटांच्या काळात लोकांनी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले होते, याची आठवण करून दिली आहे.

सोन्याच्या तेजीमागे 'डी-डॉलरकरण'

  • सोन्याच्या या तेजीमागे मोठे कारण म्हणजे डी-डॉलरकरण आहे. डॉलरचे मूल्य कमी झाल्यास सोन्याची किंमत वाढत असते.
  • चीन आणि रशियासारखे देश सध्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. गेल्या १० वर्षांत मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी जवळपास दुप्पट केली आहे.
  • भू-राजकीय अनिश्चितता, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि अमेरिकेतील 'गव्हर्मेंट शटडाउन' यामुळे सोन्याला आणखी बळकटी मिळाली आहे.

रे डालियो आणि तज्ज्ञांचा गुंतवणुकीचा सल्ला

  • सोने हा पोर्टफोलिओसाठी आवश्यक घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • रे डालियो यांचा नियम : अमेरिकेचे अब्जाधीश गुंतवणूकदार रे डालियो यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओचा सुमारे १५% हिस्सा सोन्यात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखण्यास मदत होते.
  • टाटा म्युच्युअल फंडाचा सल्ला : टाटा म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवण्यास सांगितले आहे. जर सोन्याच्या किमतीत कोणतीही छोटी घसरण झाली, तर ती खरेदीची संधी मानावी.

वाचा - रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

  • गोल्ड आणि सिल्व्हर प्रमाण : महागाई आणि तणावाच्या भीतीत सोने हा सॉलिड गुंतवणूक पर्याय आहे. तज्ज्ञांनी सोने आणि चांदीमध्ये ५०:५० या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे, कारण चांदीही आकर्षक ठरत आहे.

Web Title : गोल्ड ईटीएफ: ₹10 लाख का निवेश बढ़कर हुआ ₹1 करोड़!

Web Summary : निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्ड ने 2007 से 950% रिटर्न दिया। ₹10 लाख का निवेश अब ₹1 करोड़ है। विशेषज्ञ वैश्विक अनिश्चितताओं और डी-डॉलरीकरण के बीच सोने में निवेश जारी रखने की सलाह देते हैं, पोर्टफोलियो का 15% आवंटन की सिफारिश की गई है।

Web Title : Gold ETF: ₹10 Lakh Investment Soars to ₹1 Crore!

Web Summary : Nippon India ETF Gold delivered 950% return since 2007. A ₹10 lakh investment then is now ₹1 crore. Experts advise continued gold investment amid global uncertainties and de-dollarization, recommending 15% portfolio allocation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.