lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याला झळाळी! एक वर्षानंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे; जाणून घ्या का वाढतोय भाव?

सोन्याला झळाळी! एक वर्षानंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे; जाणून घ्या का वाढतोय भाव?

Gold Rate : एक्सचेंजच्या मते, सोन्याचा वायदा भाव जानेवारी 2021 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:38 AM2022-02-18T10:38:15+5:302022-02-18T10:38:57+5:30

Gold Rate : एक्सचेंजच्या मते, सोन्याचा वायदा भाव जानेवारी 2021 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

gold become more golden as per global concern and inflation mcx rate cross one year border | सोन्याला झळाळी! एक वर्षानंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे; जाणून घ्या का वाढतोय भाव?

सोन्याला झळाळी! एक वर्षानंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे; जाणून घ्या का वाढतोय भाव?

नवी दिल्ली : जगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारांवर पडणारी जोखीम यामुळे सोन्याची झळाळी पुन्हा वाढू लागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दराने 50,400 ची पातळी ओलांडली, जी एका वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.

एक्सचेंजच्या मते, सोन्याचा वायदा भाव जानेवारी 2021 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भावही 1,900 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. गेल्यावेळी जून 2021 मध्ये या पातळीपर्यंत पोहोचला होता. 

2022 मध्ये आतापर्यंत सोने 3.6 टक्क्यांनी महागले आहे. सोन्याच्या दरातील ही 2020 नंतरची सर्वात जलद वाढ आहे. त्यानंतर कोरोना महामारीच्या दबावाखाली सोन्याने विक्रमी पातळी 2,100 डॉलर प्रति औंसपर्यंत गाठली होती.

सोने महाग होण्याची दोन कारणे
- दरम्यान, जगभरात महागाई सातत्याने वाढत आहे. भारतातील किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला असताना, अमेरिकेत तो 40  वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे.
- रशिया आणि युक्रेनमधील तणाव इतका वाढला आहे की, आता युद्ध होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

काय आहे अंदाज?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लवकरच स्पॉट किमती 50 हजारांचा टप्पा ओलांडू शकतात. जागतिक बाजारपेठेत सोन्याची अंदाजे किंमत 1,920 डॉलर ते 1,930 डॉलरदरम्यान निश्चित केली जात असली तरी, जोखीम वाढल्यास सोन्याची किंमत 1,970 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते.

Web Title: gold become more golden as per global concern and inflation mcx rate cross one year border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.