Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले

जागतिक बाजारातील कमजोर कल आणि मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली.

By admin | Updated: July 16, 2014 01:39 IST2014-07-16T01:39:18+5:302014-07-16T01:39:18+5:30

जागतिक बाजारातील कमजोर कल आणि मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली.

Gold and silver prices declined for the second consecutive day | सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर कल आणि मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली.
सोन्याचा भाव १२० रुपयांनी कमी होऊन २८,३३० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी न मिळाल्याने चांदीचा भावही ३५० रुपयांनी खाली येऊन ४५,२५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.सोन्याचा भाव सात महिन्यांच्या नीचांकावर पोहोचला. न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव २.३ टक्क्यांनी कोसळून १,३०६.७० डॉलर प्रतिऔंस एवढा झाला. गेल्या १९ डिसेंबरनंतरची ही सर्वात मोठी घट आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Gold and silver prices declined for the second consecutive day