Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावर; Silver मध्ये १७,२५७ ची तर Gold मध्ये ₹४९२६ ची वाढ

सोन्या-चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावर; Silver मध्ये १७,२५७ ची तर Gold मध्ये ₹४९२६ ची वाढ

Gold Silver Price Today 28 Jan: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी सराफा बाजारात सोनं आणि चांदीनं विक्रमी कामगिरी सुरूच ठेवली आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:03 IST2026-01-28T14:02:02+5:302026-01-28T14:03:45+5:30

Gold Silver Price Today 28 Jan: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी सराफा बाजारात सोनं आणि चांदीनं विक्रमी कामगिरी सुरूच ठेवली आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

Gold and silver prices 28 jan 2026 hit record high Silver up by rs 17257 and Gold up by rs 4926 | सोन्या-चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावर; Silver मध्ये १७,२५७ ची तर Gold मध्ये ₹४९२६ ची वाढ

सोन्या-चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावर; Silver मध्ये १७,२५७ ची तर Gold मध्ये ₹४९२६ ची वाढ

Gold Silver Price Today 28 Jan: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी सराफा बाजारात सोनं आणि चांदीनं विक्रमी कामगिरी सुरूच ठेवली आहे. मंगळवारच्या बंद भावाच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४,९२६ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल १७,२५७ रुपयांनी महागली असून प्लॅटिनमच्या किमतीतही १,९३५ रुपयांची वाढ झाली आहे.

सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे नवीन दर

आयबीजेएनं (India Bullion and Jewellers Association) जारी केलेल्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, GST सह चांदीचा भाव आता ३,७२,६७५ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर GST सह १,६८,७४१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यासोबतच प्लॅटिनमचा दरही वाढून ८६,९२७ रुपयांवर पोहोचलाय.

स्वस्त होणार कर्जाचा ईएमआय; फेब्रुवारीमध्ये RBI सामान्यांना देऊ शकते दिलासा

तीन दिवसांतील विक्रमी वाढ

गेल्या केवळ तीन व्यापारी दिवसांत चांदीच्या किमतीत ६२,११० रुपयांची, तर सोन्याच्या किमतीत १२,६९९ रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या तुलनेत चांदीचा वेग पाच पटीनं जास्त राहिला आहे. २०२६ या वर्षाच्या अवघ्या २८ दिवसांत चांदी १,८०,२०५ रुपयांनी आणि सोनं ३२,३१० रुपयांनी महागलं आहे. आज बाजार उघडताना जीएसटीशिवाय सोन्याचा दर १,६३,८२७ रुपये आणि चांदीचा दर ३,६१,८२१ रुपये होता.

कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर 

सोन्याच्या विविध प्रकारांनुसार आजचे दर (मेकिंग चार्जशिवाय) खालीलप्रमाणे आहेत:

  • २३ कॅरेट: सोन्याचा दर ४,९०६ रुपयांनी वाढून जीएसटीसोबत १,६८,०६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
  • २२ कॅरेट: ४,५१३ रुपयांच्या वाढीसह जीएसटीसोबत भाव १,५४,५६७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
  • १८ कॅरेट: ३,६९४ रुपयांच्या वाढीसह GST सोबत किंमत १,२६,५५६ रुपये झाली आहे.
  • १४ कॅरेट: २,८८२ रुपयांच्या वाढीसह GST सोबत दर ९८,७१४ रुपये झाला आहे.
     

मंगळवारी बाजार बंद होताना चांदीचा भाव (GST शिवाय) ३,४४,५६४ रुपये होता, तर सोन्याचा भाव १,५८,९०१ रुपये होता. आयबीजेएद्वारे दिवसातून दोनदा दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold and silver prices 28 jan 2026 hit record high Silver up by rs 17257 and Gold up by rs 4926