Gold Rate Weekly Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चांदीमध्ये कधी मोठी घसरण झाली, तर कधी तूफानी वेगाने वाढ अनुभवली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात किमतीत थोडी घट झाली असली, तरी एकूण आठवडाभरात सोने आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदी आता २.५० लाखांच्या वर, तर सोने १.३७ लाखांच्या पुढे व्यवहार करत आहे.
चांदीची 'सुसाट' धाव! आठवड्यात १५,६८६ रुपयांची झेप
चांदीच्या किमतीत गेल्या पाच दिवसांत अभूतपूर्व चढ-उतार पाहायला मिळाले. २ जानेवारी रोजी 'एमसीएक्स'वर चांदी २,३६,३१६ रुपये प्रति किलो होती. ती आठवड्याभरात २,५९,६९२ रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी चांदीत ७२३ रुपयांची किरकोळ घसरण होऊन ती २,५२,००२ रुपये प्रति किलोवर बंद झाली. तरीही, संपूर्ण आठवड्याचा विचार करता चांदी १५,६८६ रुपयांनी महागली आहे. चांदी सध्या तिच्या उच्चांकावरून (२,५९,६९२ रु.) सुमारे ७,६९० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
सोन्याचीही 'चमक' वाढली; २४ कॅरेट १.३७ लाखांवर
सोन्याच्या दरातही आठवडाभरात लक्षणीय वाढ झाली आहे. २ जानेवारी रोजी सोने १,३५,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम होते. शुक्रवारी ते किरकोळ वाढीसह १,३८,८७५ रुपयांवर बंद झाले. आठवडाभरात सोने ३,११४ रुपयांनी महागले आहे. सोन्याचा आतापर्यंतचा ऐतिहासिक उच्चांक १,४०,४६५ रुपये आहे. या किमतीच्या तुलनेत सोने अजूनही १,५९० रुपयांनी स्वस्त आहे.
घरगुती बाजारातील सोन्याचे दर
'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'च्या माहितीनुसार, आठवड्याच्या अखेरीस विविध कॅरेटच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे होते.
- २४ कॅरेट सोने : १,३७,१२० रुपये (प्रति १० ग्रॅम)
- २२ कॅरेट सोने : १,३३,८३० रुपये
- २० कॅरेट सोने : १,२२,०४० रुपये
- १८ कॅरेट सोने : १,११,०७० रुपये
- १४ कॅरेट सोने : ८८,४४० रुपये
वाचा - भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
वरील दरांमध्ये 'जीएसटी' आणि 'मेकिंग चार्जेस'चा (घडणावळ) समावेश नाही. सराफा दुकानात दागिने खरेदी करताना हे अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात, ज्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत वाढते.
