Gig Workers on Strike : तुम्ही जर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर थांबा! तुम्हाला बी प्लॅन रेडी ठेवावा लागेल. अन्यथा ऐनवेळी धावपळ होऊ शकते. कारण, ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या 'गिग वर्कर्स'नी आता आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने या संपाची हाक दिली असून, कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे.
१० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलला तीव्र विरोध
वर्कर्सनी केंद्र आणि राज्य सरकारांना या प्लॅटफॉर्म कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जीव धोक्यात घालून केली जाणारी '१० मिनिटांची डिलिव्हरी' ही पद्धत त्वरित बंद करण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. २५ डिसेंबर रोजी पुकारलेल्या संपाचा परिणाम अनेक शहरांतील ऑनलाइन सेवांवर झाल्याचे दिसून येत आहे.
गिग वर्कर्सच्या ९ प्रमुख मागण्या
- पारदर्शक वेतन : कामासाठी न्याय्य आणि पारदर्शक वेतन संरचना लागू करावी.
- आयडी ब्लॉकिंगवर बंदी : कोणत्याही प्रक्रियेशिवाय आयडी ब्लॉक करणे आणि दंड आकारणे थांबवावे.
- सुरक्षा साधने : कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा गियर आणि उपाययोजना पुरवाव्यात.
- भेदभावमुक्त काम : अल्गोरिदमच्या आधारे कामाचे वाटप करताना भेदभाव न करता सर्वांना समान संधी द्यावी.
- सामाजिक सुरक्षा : आरोग्य विमा, अपघात विमा आणि पेन्शन यांसारख्या सामाजिक सुरक्षा कवच मिळावे.
- कामाच्या तासांचे नियोजन : कामाच्या दरम्यान विश्रांती आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेऊ नये.
वाचा - नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
नेमके कोण असतात 'गिग वर्कर्स'?
ज्या कर्मचाऱ्यांना ठराविक पगाराऐवजी 'काम तेवढा मोबदला' या तत्त्वावर ठेवले जाते, त्यांना गिग वर्कर म्हटले जाते. याचे साधारण ५ प्रकार पडतात.
