Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी चलन भांडार ११ अब्ज डॉलरनी वाढले

विदेशी चलन भांडार ११ अब्ज डॉलरनी वाढले

देशाच्या विदेशी चलन भांडारात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ अब्ज डॉलरने वाढ नोंदली गेली आहे.

By admin | Updated: May 26, 2014 00:22 IST2014-05-26T00:22:34+5:302014-05-26T00:22:34+5:30

देशाच्या विदेशी चलन भांडारात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ अब्ज डॉलरने वाढ नोंदली गेली आहे.

Foreign exchange reserves increase by 11 billion dollars | विदेशी चलन भांडार ११ अब्ज डॉलरनी वाढले

विदेशी चलन भांडार ११ अब्ज डॉलरनी वाढले

मुंबई : देशाच्या विदेशी चलन भांडारात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ अब्ज डॉलरने वाढ नोंदली गेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात एक मजबूत व स्थिर सरकार बनणार असल्याने जगभरातील स्थानिक बाजारात मोठ्या संख्येने डॉलरचा साठा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा ३१४.९३ अब्ज डॉलर होता. आॅक्टोबर २०११ नंतरची ही नवी उच्चांकी पातळी आहे. यावेळी विदेशी चलन भांडार ३२०.३९ अब्ज डॉलर होते. भारतीय भांडवल बाजार नियंत्रण संस्था सेबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात एफआयआयने शेअर आणि कर्ज बाजारात ४.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. विदेशी चलन साठा चालू आर्थिक वर्षात १६ मे रोजीपर्यंत १२ अब्ज डॉलरने वाढला. (प्रतिनिधी) वाढून २८७.८१ अब्ज डॉलरवर गेला आहे. गेल्या पंधरवड्यात रुपया ३ टक्क्यांनी बळकट झाला. २३ मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ५८.५२ वर बंद झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Foreign exchange reserves increase by 11 billion dollars