Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

BlackBerry Failure Story: २००८ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. जेव्हा ते या पदावर पोहोचले तेव्हा ते ब्लॅकबेरी फोन वापरत होते. मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा ब्लॅकबेरी अचानक बाजारातून गायब कसा झाला, जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:04 IST2025-07-23T15:03:28+5:302025-07-23T15:04:27+5:30

BlackBerry Failure Story: २००८ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. जेव्हा ते या पदावर पोहोचले तेव्हा ते ब्लॅकबेरी फोन वापरत होते. मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा ब्लॅकबेरी अचानक बाजारातून गायब कसा झाला, जाणून घेऊ.

First the iPhone was called a toy Blackberry s empire slowly declined Read the full story of the fall | आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

BlackBerry Failure Story: २००८ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. जेव्हा ते या पदावर पोहोचले तेव्हा ते ब्लॅकबेरी फोन वापरत होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी ब्लॅकबेरी वापरणं सुरूच ठेवलं. आपण ब्लॅकबेरीशिवाय राहू शकत नाही, असं ते एकदा म्हणाले होते. तोपर्यंत, बिझनेस क्लास लोकांसाठी स्मार्टफोन म्हणजे फक्त आणि फक्त ब्लॅकबेरी होता. पण आज, जेव्हा आपण २०२५ मध्ये आहोत, तेव्हा अनेक लोकांना या ब्रँडचं नावही माहीत नसेल. २०१० च्या आसपास जन्मलेल्या लोकांना कदाचित हे माहितही नसेल की ब्लॅकबेरी नावाची कंपनी फोन बनवत होती. पण हे कसं घडलं? ब्लॅकबेरी लोकांच्या मनातून कशी उतरत गेली? एकेकाळी सर्वात लोकप्रिय फोन तयार करणाऱ्या कंपनीचं काय झालं? जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

ब्लॅकबेरी फोन हा खरंतर पहिला फोन होता जो बिझनेस क्लासला आवडला होता. त्याचा QWERTY कीबोर्ड, इनबिल्ट सिक्युरिटी आणि BBM (ब्लॅकबेरी मेसेंजर) चॅट यामुळे तो खास बनला होता. बीबीएम ही प्रत्यक्षात एक इन्स्टंट मेसेजिंग सेवा होती, जी विशेषतः ब्लॅकबेरी फोन युजर्ससाठी होती. जसं आपण आज WhatsApp वापरतो तशा प्रकारची ती सुविधा होती. बीबीएम वापरण्यासाठी, एक पिन आवश्यक होता, ज्याद्वारे युजर्स एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत होते. एकदा कनेक्ट झाल्यानंतर, टेक्स्ट मेसेज, इमेजेस, व्हॉइस नोट्स, स्टिकर्स आणि ग्रुप चॅट्स देखील करता यायचे. बीबीएमचा वापर अतिशय सुरक्षित, जलद आणि सुरक्षित मेसेजिंगसाठी केला जात असे. तोपर्यंत अँड्रॉइड आणि आयफोन अस्तित्वात नव्हते. व्हॉट्सअॅपही नव्हतं. म्हणूनच बिझनेस प्रोफेशनल्सनी ही मेसेजिंग सेवा वापरली.

सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?

छोट्याशा कल्पनेचं मोठ्या कंपनीत रुपांतर

१९८४ मध्ये, माइक लाझारिडिस आणि डग्लस फ्रेगिन या दोन कॅनेडियन इंजिनिअर्सनं मिळून रिसर्च इन मोशन (Research In Motion -RIM) नावाची कंपनी स्थापन केली. सुरुवातीच्या काळात, RIM नं वायरलेस डेटा ट्रान्समिशन आणि पेजिंग सिस्टमवर काम केलं.

पण खरी क्रांती १९९९ मध्ये झाली, जेव्हा त्यांनी ब्लॅकबेरी ८५० लाँच केलं. ते एक लहान उपकरण होतं ज्यामध्ये ईमेल पाठवण्याची आणि मिळवण्याची क्षमता होती. हळूहळू, RIM नं त्याचे मोबाईल फोनमध्ये रूपांतर केलं आणि जगासमोर एक उपकरण आणलं, ज्याचा वापर प्रोफेशनलसारखा मानला जात होता. आता ईमेल तपासण्यासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटर उघडण्याची गरज नव्हती.

२००० च्या दशकाच्या सुरुवातीला ब्लॅकबेरीनं व्यवसाय जगतात आपलं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. ब्लॅकबेरी फोनच्या फीचर्समुळे तो मोठ्या कंपन्या, बँकिंग क्षेत्र आणि अगदी व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचला. सीएनएन बिझनेसच्या वृत्तानुसार, सुरक्षा एजन्सींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना हा फोन वापरू नका असा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी तो ऐकला नाही. आपण ब्लॅकबेरीशिवाय राहू शकत नाही, असंही ते म्हणाले होते.

ब्लॅकबेरीची घसरण कशी सुरू झाली?

आयफोन बाजारात येईपर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं. पहिला आयफोन २००७ मध्ये आला. त्यात पूर्ण टचस्क्रीन होता, त्यामुळे इंटरनेट ब्राउझ करता येत होतं, अ‍ॅप स्टोअरमधून वेगवेगळे अ‍ॅप्स डाउनलोड करता येत होते आणि वापरता येत होते. फोन वापरणाऱ्या लोकांना आयफोनची संकल्पना आवडली. पण ब्लॅकबेरीच्या कर्त्याधर्त्यांना तो एक विनोद वाटला. 'लॉजिंग द सिग्नल' नावाच्या पुस्तकात, ब्लॅकबेरीचे सीईओ जिम बाल्सिली आणि माइक लाझारिडिस यांनी ते एक खेळणं असल्याचं म्हटलं होतं. त्यांचा असा विश्वास होता की प्रोफेशनल युजर्स टचस्क्रीनचा अवलंब करणार नाहीत. QWERTY कीबोर्ड नेहमीच वापरात राहिल आणि यानंच ब्लॅकबेरीला बुडवलं.

आयफोनमध्ये अॅप्सही होते

आयफोनचं अ‍ॅप स्टोअर आलं होतं. त्यात अनेक वेगवेगळे अ‍ॅप्स होते. मोबाईल अॅप्सच्या युगात, ब्लॅकबेरीकडे अॅप इकोसिस्टम नव्हती. युझर एक्सपिरिअन्सऐवजी, कंपनी फक्त सुरक्षा आणि बिझनेस ईमेलपुरती मर्यादित होती. दरम्यान, अँड्रॉइडनंही एन्ट्री केली. पूर्ण टचस्क्रीनची क्रेझ वाढत होती, पण ब्लॅकबेरीमध्ये हा बदल दिसून आला नाही. २०१० पर्यंत, अँड्रॉइड आणि आयफोननं बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली होती, तर ब्लॅकबेरी जुने सॉफ्टवेअर आणि जुनाट डिझाइनमध्येच अडकून होते.

उशिरा शहाणपण सुचलं, पण....

जेव्हा ब्लॅकबेरीच्या कर्त्याधर्त्यांचे डोळे उघडले तोवर उशीर झाला होता. २०१३ मध्ये, ब्लॅकबेरीनं एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम, ब्लॅकबेरी १० आणि टच स्क्रीन फोन सादर केले. या फोनची खासियत अशी होती की ते अँड्रॉइड अॅप्स देखील चालवू शकत होता. पण ग्राहकांचे विचार बदलले होते आणि डेव्हलपर्सचेही विचार बदलले होते. अ‍ॅप डेव्हलपर्स आता ब्लॅकबेरीसाठी नाही तर अँड्रॉइड आणि आयओएससाठी अ‍ॅप्स बनवतात. युझर्सनं ब्लॅकबेरीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमकडे किंवा टचस्क्रीन फोनकडे पाठ फिरवली. २-३ वर्षे संघर्ष केल्यानंतर, कंपनीनं २०१६ मध्ये अधिकृतपणे पराभव स्वीकारला आणि यापुढे मोबाईल फोन बनवणार नाही अशी घोषणा केली.

Web Title: First the iPhone was called a toy Blackberry s empire slowly declined Read the full story of the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.