घटस्फोटात पैसे न देण्यासाठी लोक तयार करताहेत ट्रस्ट
भारतामध्ये लग्नापूर्वीचे करार वैध मानले जात नाहीत. लोक लग्न मोडल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी नवे मार्ग शोधत आहेत.
देशात घटस्फोटाच्या वाढत्या घटना, विशेषतः श्रीमंत लोकांच्या घटस्फोटांमुळे, श्रीमंत कुटुंबं खासगी कौटुंबिक डिस्क्रेशनरी ट्रस्ट स्थापन करत आहेत.
मुंबईतील ज्वेलर्समालकानं त्यांची सर्व मालमत्ता एका ट्रस्टमध्येठेवलीये आणि त्यांच्या मुलाला त्याचा लाभार्थी बनवलंय.
जेव्हा मुलानं घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा पत्नीला त्या मालमत्तेवर दावा करता आला नाही. दिल्लीतील कापड निर्यातदारानंही असेच आपले घर सुरक्षित ठेवलंय.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आता घटस्फोट लक्षात घेऊन ट्रस्ट डीड बनवले जात आहेत. पूर्वी फक्त श्रीमंत लोक ही पद्धत वापरत असत, परंतु मध्यमवर्गीयही याचा वापर करू लागले आहेत.
ट्रस्ट म्हणजे ट्रस्टीद्वारेलाभार्थ्यांच्या हिताचं रक्षण करणं. याचा अर्थ असा की ट्रस्ट एका प्रकारे मालमत्तेचं संरक्षण करण्याचं काम करतं.
ट्रस्ट अशा प्रकारे तयार केली जाते की कायदेशीररीत्या मुलाच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसते. तो फक्त एक लाभार्थी असतो. यामुळे घटस्फोट झाल्यास मालमत्तेवर दावा करण्याची शक्यता कमी होते.
३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल