Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुजरातेत होणार आशियातील पहिले बॅलेस्टिक सेंटर चिलखती वाहनांची देशात होणार चाचणी

गुजरातेत होणार आशियातील पहिले बॅलेस्टिक सेंटर चिलखती वाहनांची देशात होणार चाचणी

गांधीनगर : चिलखती वाहनांची चाचणी घेण्यात आत्मनिर्भर होण्यासाठी गुजरातमध्ये आशियातील पहिला बॅलेस्टिक सेंटर उदयास येत आहे. गांधीनगर येथील गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटीमध्ये बॅलेस्टिक रिसर्च सेंटर लवकरच सुरू होत आहे.

By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST2014-09-01T20:01:00+5:302014-09-01T20:01:00+5:30

गांधीनगर : चिलखती वाहनांची चाचणी घेण्यात आत्मनिर्भर होण्यासाठी गुजरातमध्ये आशियातील पहिला बॅलेस्टिक सेंटर उदयास येत आहे. गांधीनगर येथील गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटीमध्ये बॅलेस्टिक रिसर्च सेंटर लवकरच सुरू होत आहे.

The first ballistic center in Asia will be a test drive for strategic vehicles in the country | गुजरातेत होणार आशियातील पहिले बॅलेस्टिक सेंटर चिलखती वाहनांची देशात होणार चाचणी

गुजरातेत होणार आशियातील पहिले बॅलेस्टिक सेंटर चिलखती वाहनांची देशात होणार चाचणी

ंधीनगर : चिलखती वाहनांची चाचणी घेण्यात आत्मनिर्भर होण्यासाठी गुजरातमध्ये आशियातील पहिला बॅलेस्टिक सेंटर उदयास येत आहे. गांधीनगर येथील गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटीमध्ये बॅलेस्टिक रिसर्च सेंटर लवकरच सुरू होत आहे.
मोठ्या ट्रकप्रमाणे असलेल्या बुलेटप्रूफ चिलखती वाहनांची चाचणी घेण्यासाठी जीएफएसयूमध्ये बॅलेस्टिक रिसर्च सेंटर उभारण्यात येईल. अशाप्रकारचे हे आशियातील पहिले केंद्र असेल, असे जीएफएसयूचे महासंचालक जे. एम. व्यास म्हणाले.
आतापर्यंत भारतातील चिलखती वाहने ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशात चाचणीसाठी पाठवली जात होती. यापुढे आपल्या उत्पादकांना चाचणीसाठी त्यांची वाहने परदेशात पाठवण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वाहतुकीवरील आणि चाचण्यांवरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची बचत होईल. भारत चिलखती वाहनांच्या चाचण्यांमध्ये आत्मनिर्भर होईल.
गुजरातमधील एफएसएल आतापर्यंत बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि बुलेटप्रूफ प्लेट्स आदींची चाचणी घेऊ शकत होते. पण या नवीन उपक्रमामुळे संपूर्ण चिलखती वाहनांची यशस्वीपणे चाचणी घेऊ शकणार आहे.
बॅलेस्टिक रिसर्च सेंटर भारतीय लष्कराची चिलखती वाहनांची चाचणी घेईल तसेच व्हीआयपींना वाहने पुरविणार्‍या खासगी कंपन्यांच्या वाहनांची चाचणी करून दिली जाईल.
केंद्रासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. केंद्राचे काम एक किंवा दोन महिन्यात सुरू होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सहा कोटी रुपये आहे. केंद्र अन्य देशांना देखील सेवा देईल.
भारतातील हे पहिले बॅलेस्टिक सिरर्च सेंटर आहे. शेजारी देशांसोबत इतर देशांना सेवा दिली जाईल, असे व्यास म्हणाले. एका छोट्या पिस्तुलपासून ते एके ४७ आणि इन्सास रायफल यांच्याद्वारे चिलखती वाहनांवर गोळी झाडून चाचणी घेतली जाईल. वाहनांची चाचणी घेताना उत्पादक बघू शकतील, अशी पद्धत केंद्र अवलंबणार आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: The first ballistic center in Asia will be a test drive for strategic vehicles in the country