Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सार्वजनिक बँकांच्या आर्थिक स्थिती सुधारणेसाठी अर्थमंत्रालयाच्या सूचना

सार्वजनिक बँकांच्या आर्थिक स्थिती सुधारणेसाठी अर्थमंत्रालयाच्या सूचना

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करावेत.

By admin | Updated: May 5, 2014 14:19 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T14:19:16+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करावेत.

Finance Ministry's suggestions for improving the financial condition of public sector | सार्वजनिक बँकांच्या आर्थिक स्थिती सुधारणेसाठी अर्थमंत्रालयाच्या सूचना

सार्वजनिक बँकांच्या आर्थिक स्थिती सुधारणेसाठी अर्थमंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करावेत व त्याअंतर्गत चालू खाती किंवा कमी गुंतवणूक लागणार्‍या खात्यांकडे, तसेच कर्जवसुलीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. वित्तीय सेवा सचिव गुरुदयालसिंग संधू यासंदर्भात बोलताना म्हणाले की बँकांना मोठ्या रकमेच्या खात्यावरील लक्ष कमी करण्यास सांगण्यात आले असून, त्याऐवजी कमी गुंतवणुकीवर चालणार्‍या चालू बचत खात्यावर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चालू बचत खात्यावर कमी दराने व्याज दिले जाते व दुसरीकडे कर्ज देताना जास्त दराने व्याज आकारता येते, त्यामुळे बँकांचे मार्जिन वाढते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका सर्वप्रकारच्या बचत खात्यावर ४ टक्के दराने व्याज देतात; पण चालू खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज दिले जात नाही. त्यामुळे चालू खात्यांचे प्रमाण वाढल्यास बँकावरील व्याजाचा दबाव कमी होतो. तसेच बँकांचा किमान उधारी दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, बुडीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Finance Ministry's suggestions for improving the financial condition of public sector