Lokmat Money > बिझनेस न्यूज > FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट

FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट

FASTag Transfer: जर तुम्हाला तुमचा FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट करायचा असेल तर हे काम थोडं सावधगिरीने करावं लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) चा "वन व्हेईकल, वन FASTag" हा नियम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:09 IST2025-07-22T12:07:08+5:302025-07-22T12:09:29+5:30

FASTag Transfer: जर तुम्हाला तुमचा FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट करायचा असेल तर हे काम थोडं सावधगिरीने करावं लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) चा "वन व्हेईकल, वन FASTag" हा नियम आहे.

FASTag transfer made easy You can shift from one bank to another without tension know process | FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट

FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट

FASTag Transfer: जर तुम्हाला तुमचा FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट करायचा असेल तर हे काम थोडं सावधगिरीने करावं लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) चा "वन व्हेईकल, वन FASTag" हा नियम आहे, ज्या अंतर्गत एका वाहनावर फक्त एकच FASTag वैध असेल, जो त्या बँकेच्या प्रीपेड वॉलेटशी जोडलेला असेल. म्हणून जर तुम्हाला ट्रान्सफर करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून टोल टॅक्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमचा जुना FASTag बंद करावा लागेल कारण तुम्हाला थेट ट्रान्सफरचा पर्याय नाही. यासाठी, तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपवर जा, “Manage FASTag” किंवा “Help and Support” वर जा आणि “I want to close my FASTag” हा पर्याय निवडा. तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून तुमचा FASTag नंबर व्हेरिफाय करा, त्यानंतर बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून विनंती सबमिट करा. लक्षात ठेवा, जर तुमची शिल्लक कमी असेल किंवा FASTag "हॉटलिस्टेड" असेल तर विनंती नाकारली जाऊ शकते. त्यात बदल करा, नंतर पुन्हा प्रयत्न करा.

८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच

पैसे असतील तर काय होणार?

आता जर तुमच्या FASTag मध्ये काही पैसे शिल्लक असतील तर ते वापरा किंवा बँकेकडून रिफंड मागा. रिफंडची विनंती केल्यानंतर, पैसे सहसा ७-१० दिवसांच्या आत तुमच्या खात्यात जमा होतात, परंतु काही शुल्क आकारलं जाऊ शकतं. यानंतर, नवीन बँकेकडून नवीन FASTag घ्यावा लागेल. नवीन बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपवर जा, “Apply for FASTag” वर क्लिक करा. तुमचं वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा, पैसे भरा आणि काही दिवसांत तुम्हाला नवा फास्टॅग मिळेल. डिलिव्हरीनंतर, तो पडताळून पाहा आणि वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवा.

नियम आणि खबरदारी

एनपीसीआयचा कडक नियम आहे की एकाच वाहनावर एकापेक्षा जास्त फास्टॅग वापरले जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही अनेक FASTags घेतले तर जुना फास्टॅग आपोआप निष्क्रिय होईल. जर ट्रान्सफर दरम्यान जुनी शिल्लक नवीन खात्यात शिफ्ट करता येत नसेल, तर प्रथम ती काढून घ्या किंवा रिफंड घ्या. प्रक्रियेत तुम्हाला काही अडचण आल्यास, बँकेच्या ग्राहक सेवेशी बोला किंवा जवळच्या शाखेला भेट द्या. जर तुम्ही योग्यरित्या हे केलं तर टोल भरण्यात कोणताही अडथळा येणार नाही.

Web Title: FASTag transfer made easy You can shift from one bank to another without tension know process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.