सध्या अनेक जण आपला ITR भरण्याच्या तयारीला लागले आहेत. अनेक करदातेशेवटच्या तारखेबाबत संभ्रमात आहेत.
सध्या अनेक जण आपला ITR भरण्याच्या तयारीला लागले आहेत. मोठ्या संख्येने करदाते आपला आयटीआर दाखल करत आहेत.
यापूर्वी सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीखही पुढे ढकलली होती. परंतु अनेक करदाते आयटीआर भरण्याच्या शेवटच्या तारखेबाबत संभ्रमात आहेत.
जर तुम्ही इंडिविज्युअल किंवा हिंदू अविभक्त कुटुंब असाल, तुमच्या खात्याचं ऑडिट करण्याची आवश्यकता नसेल तर आयटीआर भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे.
ज्या करदात्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं अनिवार्य आहे, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.
यामध्ये कंपन्या, प्रोप्रायटरशिपफर्म किंवा फर्मचे कार्यरत भागीदार समाविष्ट आहेत. दरम्यान, या करदात्यांना त्यांचे ऑडिटरिपोर्ट ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावे लागतील.
आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्याकरदात्यांनाआयटीआरची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. यात येणाऱ्याकरदात्यांनाकलम ९२ई अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक आहे
त्यांचा ऑडिट अहवाल ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करणं अनिवार्य आहे. हा नियम अशा करदात्यांना लागू होईल ज्यांचा व्यवसाय किंवा उत्पन्न आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित आहे.
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार