Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फुलेवाडी आयआरबी नाका ते खांडसरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादात अडकला रस्ता

फुलेवाडी आयआरबी नाका ते खांडसरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादात अडकला रस्ता

फुलेवाडी : कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील रंकाळा टॉवर ते सध्याचा फुलेवाडी नाक्यापर्यंतचा रस्ता आयआरबीने केला आहे. तर बालिंगा-खांडसरी (शिंगणापूर फाटा)पर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, फुलेवाडी आयआरबीच्या नाक्यापासून खांडसरीपर्यंतचा रस्ता हा मुख्य रस्त्यावरील सुमारे ३०० मी. चा. प˜ा दुर्लक्षित राहिल्यामुळे पूर्णपणे खड्डामय बनला आहे. पूर्ण रस्त्याची चाळण झाल्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. फुलेवाडी जकात नाक्याजवळ रिंगरोड येऊन मिळत असलेने वाढलेल्या वाहतुकीमुळे वारंवार ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.

By admin | Updated: May 9, 2014 23:01 IST2014-05-09T23:01:51+5:302014-05-09T23:01:51+5:30

फुलेवाडी : कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील रंकाळा टॉवर ते सध्याचा फुलेवाडी नाक्यापर्यंतचा रस्ता आयआरबीने केला आहे. तर बालिंगा-खांडसरी (शिंगणापूर फाटा)पर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, फुलेवाडी आयआरबीच्या नाक्यापासून खांडसरीपर्यंतचा रस्ता हा मुख्य रस्त्यावरील सुमारे ३०० मी. चा. प˜ा दुर्लक्षित राहिल्यामुळे पूर्णपणे खड्डामय बनला आहे. पूर्ण रस्त्याची चाळण झाल्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. फुलेवाडी जकात नाक्याजवळ रिंगरोड येऊन मिळत असलेने वाढलेल्या वाहतुकीमुळे वारंवार ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.

Falvadi road crossing road between IRB Naka to Khanduri road, road collapse in Narmada and Public Works Department | फुलेवाडी आयआरबी नाका ते खांडसरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादात अडकला रस्ता

फुलेवाडी आयआरबी नाका ते खांडसरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादात अडकला रस्ता

लेवाडी : कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील रंकाळा टॉवर ते सध्याचा फुलेवाडी नाक्यापर्यंतचा रस्ता आयआरबीने केला आहे. तर बालिंगा-खांडसरी (शिंगणापूर फाटा)पर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, फुलेवाडी आयआरबीच्या नाक्यापासून खांडसरीपर्यंतचा रस्ता हा मुख्य रस्त्यावरील सुमारे ३०० मी. चा. प˜ा दुर्लक्षित राहिल्यामुळे पूर्णपणे खड्डामय बनला आहे. पूर्ण रस्त्याची चाळण झाल्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. फुलेवाडी जकात नाक्याजवळ रिंगरोड येऊन मिळत असलेने वाढलेल्या वाहतुकीमुळे वारंवार ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.
साधारणपणे जकात नाक्याच्या आतील रस्ता हा शहर हद्दीत गणला जातो. त्यामुळे हा रस्ता आयआरबीने करणे अपेक्षित होते. मात्र, आयआरबीने हा रस्ता न केलेने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत नसलेने हा रस्ता करायचा कोणी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी एका समाजसेवी संस्थेने स्वत:च्या खर्चाने या रस्त्यावर मुरूम पसरवून वाहनचालकांना दुखण्यावर मलम लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ढिम्म प्रशासन कधी जागे होऊन या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
------------------
१) जुना फुलेवाडी नाका हा शहर हद्दीच्या बाहेर होता. फुलेवाडी आयआरबी नाका ते खांडसरी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील आहे. आपल्याकडे असलेल्या शहर हद्दीच्या नकाशावरून ते स्पष्ट करता येईल.
- एन. एस. पाटील, सहाय्यक अभियंता, मनपा
---------------
२) १९६१, ८१च्या रोड प्लॅननुसार शिंगणापूर फाट्याच्या अलीकडे १० मीटरपर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. रस्ता जर कागदोपत्री आमच्याकडे ट्रान्स्फर केल्यास आम्ही रस्ता करू.
- एस. व्ही. सांगावकर, उपअभियंता, गगनबावडा विभाग.
---------------------
३) महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी शहर हद्दीसंदर्भात बैठक घेऊन समन्वयाने हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहनचालकांना होणारा त्रास कमी होईल.
----------------------
हे करता येईल....
शिंगणापूर फाटा ते जुना फुलेवाडी जकात नाका हे अंतर सुमारे १०० मी. आहे. तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करता येईल. तर तेथून पुढे फुलेवाडी आयआरबी नाका हे अंतर २०० मी. आहे तो रस्ता महापालिकाकडून करता येईल.

Web Title: Falvadi road crossing road between IRB Naka to Khanduri road, road collapse in Narmada and Public Works Department